IPL 2023 Corona Threat 
IPL

IPL 2023 Corona Threat : IPL वर टांगती तलवार! वाढत्या कोरोना प्रादुर्भावाने लीग होणार रद्द? अधिकारी चिंतेत

Corona Threat on IPL 2023: वाढत्या कोरोना प्रादुर्भावाने लीग रद्द होणार का?

धनश्री ओतारी

Corona Threat on IPL 2023: भारतात सध्या सर्वत्र आयपीएलची चर्चा सुरु आहे. या स्पर्धेत एकापेक्षा एक रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत.दरम्यान ही स्पर्धा सुरु असतानाच आयपीएलवर कोरोनाचे काळे ढग जमा झाले आहेत.

वाढत्या कोरोना प्रादुर्भावाने लीग रद्द होणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळे चाहत्यांच्या मनात धाकधुक निर्माण झाली आहे. (IPL 2023 BCCI issues Covid 19 advisory players and staff)

दोन दिवसांपूर्वी, भारताचा माजी क्रिकेटपटू, प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्रा यांनी पुन्हा कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्विटरच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली. यामुळे पुढील काही दिवस प्रेक्षकांना आकाश चोप्रा यांची कॉमेंट्री ऐकता येणार नाही.

अशातच वाढती रुग्णांची संख्या पाहून वाढत्या कोरोना प्रादुर्भावावर बीसीसीआच्या अधिकाऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. बीसीसीआयने आता संघ मालक, खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला कोविड-19 रोखण्यासाठी अतिरिक्त खबरदारी घेण्यास सांगितले आहे. (Latest Sport News)

आम्हाला माहित आहे की कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. मात्र, काळजी करण्यासारखे काही नाही. आम्ही खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला कोविड मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.

खेळाडूंचे आरोग्य आणि सुरक्षा आमच्यासाठी सर्वोपरि आहे. सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन केले जाईल. कोरोना असे पर्यंत सर्व नियमांचे पालने केले जाईल. अस बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

देशातील कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. एका दिवसात कोरोना रुग्णांच्या चिंताजनक वाढ होताना दिसत आहे. 163 दिवसांनंतर एका दिवसात चार हजारांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे.

बुधवारी, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी देशात 4,435 लोकांना कोरोनाच लागण झाली आहे. तर १५ जणांचा मृत्यू झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Reaction : ‘’मी जर पूर्ण दाढीवरून हात फिरवला असता, तर..’’ ; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा!

IND vs ENG 2nd Test: बॅट निसटली, विकेट गेली! Rishabh Pant च्या आक्रमणाला ब्रेक, मोडला ५९ वर्षांपूर्वीचा विक्रम, Viral Video

कसलं भारी! आईच्या वाढदिवसाला लेकीने आणला मालिकांचा केक; जन्मदात्रीचा आनंद गगनात मावेना, Video Viral

Ashadhi Wari: दिंडीत मोकाट जनावरांचा हल्ला; अनेकजण जखमी, चिमुकल्यांचाही समावेश

Bhor Police : ५८ पैकी २९ पोलिस कार्यरत, ५० टक्के जागा रिक्त; भोर पोलिस ठाण्याची स्थिती

SCROLL FOR NEXT