IPL

IPL 2023 Qualifier 1: फायनलमध्ये एंट्री मिळवण्यासाठी चेन्नई अन् गुजरातला आणखी दोन संधी, जाणून घ्या कारण

धोनीचा सामना हार्दिकशी! KKR प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर

Kiran Mahanavar

IPL 2023 Qualifier 1 Chennai Super Kings vs Gujarat Titans : अखेर आयपीएल 2023 मध्ये 67 सामन्यांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर प्लेऑफमध्ये पोहोचणारे दोन संघ निश्चित झाले आहेत. गुजरातनंतर चेन्नई हा दुसरा संघ ठरला आहे ज्याने प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. चेन्नईने दिल्लीवर 77 धावांनी मात करून 17 गुणांसह दुसरे स्थान मिळवले, तर आयपीएल 2023 च्या 68 व्या सामन्यात KKR ला 79 धावांवर रोखण्यात लखनौचा संघ अपयशी ठरला, त्यामुळे चेन्नईची जागा पहिल्या क्वालिफायरमध्ये निश्चित झाली आहे. म्हणजेच क्वालिफायर वनमध्ये त्यांची लढत गुजरातशी होईल.

दिल्लीत खेळल्या गेलेल्या शेवटच्या सामन्यात चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना 3 गडी गमावून 223 धावा केल्या आणि नंतर उत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन करताना दिल्ली संघाला केवळ 149 धावांवर रोखले. दिल्लीचा संघ 20 षटकांत 9 गडी गमावून 149 धावाच करू शकला. दिल्लीकडून डेव्हिड वॉर्नरने सर्वाधिक 86 धावांची खेळी खेळली, पण तो एकटा आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.

आयपीएल 2023 चा पहिला क्वालिफायर सामना 23 मे रोजी एम चिदंबरम क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या जाणार आहे, जिथे गतविजेत्या गुजरातचा सामना 4 वेळा चॅम्पियन असलेल्या चेन्नईशी होईल. हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल.

चेन्नई आणि गुजरातला मिळणार दोन संधी

आयपीएलमधील अव्वल दोन संघांना अंतिम फेरीत जाण्यासाठी दोन संधी मिळतील. पहिल्या क्वालिफायरचा विजेता थेट अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल, तर पराभूत होणारा 26 मे रोजी क्वालिफायर 2 मध्ये खेळेल. जेथे क्वालिफायर 1 मधील पराभूत संघाचा सामना एलिमिनेटरमध्ये विजेत्या संघाशी होईल.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर हा सामना होणार आहे. एलिमिनेटर सामना 24 मे रोजी एमए चिदंबरम क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल, जिथे गुणतालिकेत क्रमांक 3 आणि 4 संघ भिडतील.

केकेआर प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर

प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी कोलकाता नाईट रायडर्सला लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध केवळ 9 षटकांत 177 धावा करायच्या होत्या पण ही कामगिरी करता आली नाही, त्यामुळे नितीश राणाच्या नेतृत्वाखालील कोलकाता संघ शेवटच्या चार शर्यतीतून बाहेर पडला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyclone Shakti: शक्ती चक्रीवादळ कुठे पोहोचले? धोका नेमका कधी टळणार? हवामान खात्याकडून तारीख जाहीर

Ramdas kadam : रामदास कदम यांचा आणखी एक खळबळजनक दावा, थेट उद्धव ठाकरेंना आव्हान

Crime News : गोळीबार प्रकरण: पंचवटी पोलिसांकडून १४वा संशयित जेरबंद, आतापर्यंत माजी नगरसेवकासह १४ अटकेत

World Cup 2025: भारताविरुद्ध पाकिस्तानने टॉस जिंकला, प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल; हस्तांदोलन झालं की नाही?

Sangli Accident Death : काम संपवून घरी निघाला होता, समोरू दुचाकी आली अन् दोघेही जाग्यावर संपले; सांगलीतील घटना

SCROLL FOR NEXT