ipl 2023 cricket lucknow lost the match in the last over gujarat won by 7 run
ipl 2023 cricket lucknow lost the match in the last over gujarat won by 7 run sakal
IPL

IPL 2023 : गमावलेला सामना गुजरातने जिंकला

सकाळ वृत्तसेवा

लखनौ : धावांचे पाठबळ भलेही कमी असेल, परंतु अखेरपर्यंत लढण्याची जिद्द कायम ठेवली तर हरलेला सामनाही जिंकता येत असतो हे गतविजेत्या गुजरात संघाने दाखवून दिले, लखनौविरुद्धचा सामना त्यांनी सात धावांनी जिंकला.

गुजरातने आजच्या सामन्यात कशाबशा ६ बाद १३५ धावा केल्या होत्या. या आव्हानासमोर लखनौने अखेरच्या षटकापर्यंत ३ बाद १२४ धावा केल्या होत्या. विजयासाठी त्यांना अखेरच्या सहा चेंडूत १२ धावांची गरज होती.

कर्णधार केएल राहुल ६८ धावांवर खेळत होता. यातील पहिल्या चेंडूवर राहुलने दोन धावाही काढल्या, परंतु पुढच्या चार चेंडूवर चार फलंदाज बाद झाले आणि त्यांनी जिंकण्याची सुवर्णसंधी असलेला सामना गमावला.

केएल राहुल आणि मार्कस स्टॉयनिस आक्रमक फटके मारण्याच्या प्रयत्नांत बाद झाले. त्यानंतर आयुष बदोनी आणि दीपक हुडा दुहेरी धाव घेण्याच्या प्रयत्नात धावचीत झाले. तेथेच सामन्याचा निकाल स्पष्ट झाला.

राहुल आणि मायर्स यांनी ६.३ षटकांत ५५ धावांची सलामी देऊनही आणि सलामीला आलेला राहुल अखेरच्या षटकापर्यंत नाबाद असूनही त्यांना सामना जिंकता आला नाही. गुजरातसाठी मोहित शर्मा पुन्हा एकदा मॅचविनर ठरला.

त्याअगोदर १९ व्या षटकात मोहम्मद शमीने पाचच धावा दिल्या होत्या.तत्पूर्वी गुजरातची फलंदाजी सुरुवातीला ढेपाळली होती. शुभमन गिल शून्यावर बाद झाल्यावर वृद्धिमन साहा आणि तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस आलेला कर्णधार हार्दिक पंड्या यांनी ६८ धावांची भागीदारी केली.

गुजरातची मधली फळीही फार काही चमक दाखवू शकली नाही, परंतु अखेरपर्यंत मैदानात राहणाऱ्या हार्दिकने ६६ धावा केल्यामुळे गुजरातला जेमतेम १३५ धावा करता आल्या.

संक्षिप्त धावफलक

गुजरात २० षटकांत ६ बाद १३५ (वृद्धिमन साहा ४७- ३७ चेंडू, ६ चौकार, हार्दिक पंड्या ६६- ५० चेंडू, २ चौकार, ४ षटकार, क्रृणाल पंड्या ४-०-१६-२, मार्कस स्टॉयनिस ३-०-२०-२, अमित मिश्रा २-०-९-१) वि. वि. लखनौ ः २० षटकांत ७ बाद १२८ (केएल राहुल ६८- ६१ चेंडू, ८ चौकार, केली मायर्स २४- १९ चेंडू, २ चौकार, १ षटकार, कृणाल पंड्या २३- २३ चेंडू, २ चौकार, १ षटकार, रशीद खान ४-०-३३-१, मोहित शर्मा ३-०-१७-२, नूर अहमद ४-०१८-२)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : युतीची सत्ता येताच उद्धवजींना मुख्यमंत्रिपदाचे वेध

आगळी दक्षिणकोंडी

‘लाट’विरहित निवडणुकीचा अन्वयार्थ...

मेंदूवर आदळणाऱ्या डिजिटल-प्रचारातून सुटलेलं काही...

एक दूसरे से करते है प्यार हम...

SCROLL FOR NEXT