ipl 2023 cricket Moeen Ali statement ms dhoni will play next ipl 2024 also Sakal
IPL

Moeen Ali : धोनी पुढल्या वर्षीही खेळणार; मोईन अली

भारताचा दिग्गज खेळाडू महेंद्रसिंह धोनी हा आयपीएलचा अखेरचा मोसम खेळत आहे, अशी चर्चा क्रिकेटविश्‍वात रंगू लागली

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : भारताचा दिग्गज खेळाडू महेंद्रसिंह धोनी हा आयपीएलचा अखेरचा मोसम खेळत आहे, अशी चर्चा क्रिकेटविश्‍वात रंगू लागली आहे. मात्र धोनीचे यंदाच्या आयपीएलमध्ये नेतृत्व व फलंदाजी पाहता तो पुढील वर्षीही ही स्पर्धा खेळणार असल्याचे भाकीत चेन्नई सुपर किंग्सचा त्याचा सहकारी मोईन अली याने सोमवारी व्यक्त केले आहे.

मोईन अली पुढे म्हणाला, धोनीला मी नेटमध्ये फलंदाजी करताना बघितले आहे. त्यामुळे राजस्थानविरुद्ध त्याने केलेली खेळी आश्‍चर्याचा धक्का देणारी नव्हती. धोनीचे सध्याचे वय ४१ आहे. या वयातही तो दमदार फलंदाजी करीत आहे.

ही वाखाणण्याजोगी बाब आहे. एवढेच नव्हे तर तो खालच्या क्रमांकावर फलंदाजीला येतो. या वयामध्ये खालच्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन आक्रमक फलंदाजी करणे हे सोपे काम नाही. तो पुढल्या वर्षीही नक्की खेळेल.

अखेरचा विश्‍वकरंडक

मोईन अली याने भारतात या वर्षी होणार असलेल्या वन डे विश्‍वकरंडकाबाबत आपले मत व्यक्त केले. तो म्हणाला, वन डे मधील हा माझा शेवटचा विश्‍वकरंडक असणार आहे. भारतात ही स्पर्धा होणार आहे.

त्यामुळे फिरकीपटू येथे महत्त्वाची भूमिका बजावतील. माझ्या खांद्यावर मोठी जबाबदारी असेल. ही स्पर्धा माझ्यासाठी व संघासाठी चांगली ठरावी ही इच्छा आहे. आम्हाला जेतेपद राखायचे आहे, असेही मोईन अलीने आवर्जून नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT