IPL 2023 DC vs SRH Fan Fight Video Viral  
IPL

IPL 2023 : 'आधी तोंडावर नंतर पोटात... ' DC vs SRH सामन्यादरम्यान चाहत्यांमध्ये हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

चाहत्यांमध्ये हाणामारी नेमकी कशामुळे झाली?

Kiran Mahanavar

IPL 2023 DC vs SRH Fan Fight Video Viral : अरुण जेटली स्टेडियमवर शनिवारी सनरायझर्स हैदराबादने दिल्ली कॅपिटल्सचा नऊ धावांनी पराभव करत सामना जिंकला. मात्र या सामन्यादरम्यान स्टेडियममधील चाहत्यांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली.

चाहत्यांमधील हाणामारी कॅमेऱ्यात कैद झाली. यात कोणीही जखमी झाले नाही पण हाणामारी नेमकी कशामुळे झाली हे अद्याप समजू शकलेले नाही. आता व्हायरल होत असलेल्या क्लिपमध्ये खुर्च्या फेकल्या जात आहेत आणि आधी तोंडावर नंतर पोटात लाथा बुक्क्या मारल्या जात आहे खूप गोंधळ सुरू आहे.

सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास मिचेल मार्शची अष्टपैलू कामगिरी (बॉलिंगसह 4-27 आणि 39 चेंडूत 63) व्यर्थ गेली कारण आयपीएल 2023च्या 40 क्रमांकाच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने दिल्ली कॅपिटल्सचा नऊ धावांनी पराभव केला.

अभिषेक शर्माचा अष्टपैलू खेळ आणि शेवटच्या षटकात हेनरिक क्लासेनच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर शनिवारी येथे झालेल्या इंडियन प्रीमियर लीग टी-20 सामन्यात सनरायझर्स हैदराबादने दिल्ली कॅपिटल्सचा नऊ धावांनी पराभव केला.

प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादने सलामीवीर अभिषेकच्या 36 चेंडूत 67 धावा आणि क्लासेनच्या 27 चेंडूत नाबाद 53 धावांच्या जोरावर 6 बाद 197 धावा केल्या. हैदराबादची जी चालू मोसमातील या मैदानावरील सर्वोच्च धावसंख्या आहे. संघाकडून अब्दुल समदने 21 चेंडूत 1 चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 28 धावा केल्या.

मिचेल मार्शचा अष्टपैलू खेळ आणि फिल सॉल्टसोबत दुसऱ्या विकेटसाठी 66 चेंडूत 112 धावांची भागीदारी दिल्ली संघासाठी अपुरी ठरली आणि संघाला 20 षटकांत सहा गडी गमावून 188 धावाच करता आल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोबाईल हॅक झाल्याची भीती, फार्मसीच्या २० वर्षीय तरुणानं जीवन संपवलं; एकुलत्या एक लेकाच्या मृत्यूनं आई-वडिलांचा आक्रोश मन हेलावणारा

CA Exam Result: 'सीए परीक्षेत सांगलीतील २० जणांचे उल्‍लेखनीय यश'; गेली काही वर्षे विद्यार्थ्यांचे यशात सातत्य

Eco Friendly Bill: ‘महावितरण’च्या ‘गो ग्रीन’ योजनेचा पाच लाख ग्राहकांनी घेतला फायदा

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : पुण्यात २६ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; पोलिसांची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT