IPL 2023 | Delhi Capitals vs Gujarat Titans | Cricket News in Marathi  
IPL

Delhi Capitals vs Gujarat Titans: दिल्ली विजयी लयीत परतणार की गुजरात वर्चस्व गाजवणार? आज राजधानीत रंगणार सामना

IPL 2023 Delhi Capitals vs Gujarat Titans: दिल्ली कॅपिटल्सला सलामीच्या लढतीत लखनौ संघाकडून ५० धावांनी पराभव पत्करावा लागला आता...

सकाळ ऑनलाईन टीम

IPL 2023 Delhi Capitals vs Gujarat Titans : दिल्ली कॅपिटल्सला सलामीच्या लढतीत लखनौ सुपर जायंटस् संघाकडून ५० धावांनी पराभव पत्करावा लागला. आता दिल्ली कॅपिटल्सचा संघ आज अरुण जेटली स्टेडियम या घरच्या मैदानावर यंदाच्या मोसमातील पहिली लढत खेळणार आहे. त्यांच्यासमोर गतविजेत्या गुजरात टायटन्सचे आव्हान असणार आहे.

डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वात मैदानात उतरणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सला या वेळी पहिल्यावहिल्या विजयाची आस लागली आहे. हार्दिक पंड्याचा गुजरात अयटन्स संघ विजयी मालिका कायम ठेवण्यासाठी सर्वस्व पणाला लावेल. (Latest Marathi News)

कार अपघातात जखमी झालेल्या रिषभ पंतच्या अनुपस्थितीत दिल्ली संघाचे नेतृत्व डेव्हिड वॉर्नरकडे सोपवण्यात आले आहे. सलामीच्या लढतीत दिल्लीच्या संघाला अव्वल दर्जाच्या वेगवान गोलंदाजांची उणीव प्रकर्षाने जाणवली. खलील अहमद, चेतन सकारीया व मुकेश कुमार या भारतीय वेगवान गोलंदाजांकडून अपेक्षित कामगिरी झाली नाही. यामध्ये भरीसभर म्हणजे खलील अहमदकडून

काईल मेयर्सचा झेल सोडण्यात आला. हा झेल दिल्लीला महागात पडला. खलील अहमद क्षेत्ररक्षणात सुमार आहे. हा आजवरचा इतिहास आहे.

लुंगी एनगिडी व अॅनरिक नॉर्किया है दक्षिण आफ्रिकेचे वेगवान गोलंदाज नेदरलँडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत देशाचे प्रतिनिधित्व करीत होते. त्यामुळे पहिल्या लढतीत ते खेळू शकले नाहीत, पण दक्षिण आफ्रिका- नेदरलँड यांच्यामधील अखेरचा सामना २ एप्रिलला पार पडला. आता आजच्या लढतीत त्यांचे पुनरागमन होण्याची शक्यता आहे. (Marathi Tajya Batmya)

या दोन्ही वेगवान गोलंदाजांना आजच्या लढतीत सहभागी होता आले नाही, तर बांगलादेशच्या मुस्तफिझूर रहमान याला अंतिम अकरामध्ये संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आजची लढत - दिल्ली कॅपिटल्स - गुजरात टायटन्स

ठिकाण- अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली

वेळ-संध्याकाळी ७.३० वा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Ambabai Temple : नवरात्रोत्सवाच्या धामधुमीत कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात नवा वाद; देवस्थान समितीविरोधात पुजारी आक्रमक; नेमका वाद काय?

SA vs AUS 1st Test: व्हॉट अ कॅच...! स्टीव्ह स्मिथची चतुराई अन् आफ्रिकन फलंदाजचा करेक्ट कार्यक्रम; ऑसी खेळाडूचा विश्वविक्रम Video

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर कारखाना निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचे खाते उघडले; संग्राम सोरटे विजयी

Nagpur EVM Training: आगामी निवडणुकीत ‘एस-३’ मतदान यंत्राचा वापर;नागपूर जिल्ह्याला तीन हजार कंट्रोल युनिट प्राप्त; कार्यपद्धतीचे प्रशिक्षण

पत्नीशी वडिलांचे अनैतिक संबंध असल्याचा संशय, ३२ वर्षीय मुलाने वडिलांना झोपेतच संपवलं; डोंबिवली हादरली

SCROLL FOR NEXT