Prithvi Shaw IPL 2023  
IPL

Prithvi Shaw IPL 2023 : पृथ्वी शॉचा पगार ८ कोटी, ६ मॅच ४७ धावा! दिल्ली कॅपिटल्सने दाखवला बाहेरचा रस्ता

Sandip Kapde

Prithvi Shaw IPL 2023 : पृथ्वी शॉचा संकटाचा काळ सुरू झाला आहे. सलग सहा सामन्यांमध्ये सुपरफ्लॉप ठरल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सने पृथ्वीला बाहेरचा रस्ता दाखवला. दिल्ली कॅपिटल्सने पृथ्वी शॉला ८ कोटींमध्ये घेतले होते. प्लेइंग इलेव्हन तर दूरच, वॉर्नरने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध शेवटच्या १६ मध्येही त्याचा समावेश केला नाही.

गेल्या काही सामन्यांमध्ये वॉर्नर एक प्रभावशाली खेळाडू म्हणून मैदानावर आपली ताकद दाखवण्याची संधी त्याला देत होता. पण शॉला संधीचा फायदा उठवता आला नाही.

पृथ्वी शॉ सतत खराब फॉर्मशी झुंजत आहे. गेल्या ६ सामन्यांमध्ये त्याची सर्वोत्तम खेळी १५ धावांची होती, जी मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळली गेली होती. त्याला ६ सामन्यात २ वेळा खातेही उघडता आले नाही. ६ सामन्यांमध्ये शॉचा स्कोअर १२, ७, ०, १५, ० आणि १३ होता. दिल्लीने त्याला फॉर्ममध्ये येण्यासाठी अनेक संधी दिल्या, पण त्याला लय सापडली नाही.

सर्फराज खानला संधी मिळाली -

शॉच्या जागी सरफराज खानला संधी देण्यात आली आहे. सरफराजशिवाय दिल्लीने रिपल पटेललाही संधी दिली आहे. शॉच्या खराब फॉर्मने दिल्लीलाही अडचणीत टाकले आहे.

शॉला संघातून वगळण्यापूर्वी दिल्लीने २ फलंदाजांना चाचणीसाठी बोलावले होते . बंगालचा सलामीवीर अभिमन्यू ईश्वरन आणि यूपीचा प्रियम गर्ग यांचा या शिबिरात समावेश होता. अशा परिस्थितीत शॉवर संकट कोसळणार असल्याची चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT