IPL 2023 
IPL

IPL 2023: गुजरात-राजस्थानमध्ये आज श्रेष्ठत्वाची लढाई; हार्दिक पंड्या फॉर्मच्या शोधात

वर्चस्व राखण्यासाठी गतविजेत्यांचा प्रयत्न

धनश्री ओतारी

अहमदाबाद, ता. १५ (पीटीआय) ः मोहातील पंजाब किंग्सचा अथडळा पार करून आपली गाडी रुळावर आणणारे गतविजेते गुजरात टायटन्स आज फॉर्मात असलेल्या राजस्थान रॉयल्सशी दोन हात करत आहे. हा सामना जिंकून त्यांना पुन्हा अव्वल स्थानावर जाण्याची संधी आहे.(IPL 2023 GT vs RR Who will win today match Hardik Pandya )

गतवर्षी पदार्पण करणाऱ्या गुजरात संघाचे राजस्थानविरुद्ध एकूण तीन सामने झाले आहेत आणि या तिन्ही लढतीत गुजरात विजयी झाले आहेत, त्यामुळे इतिहास त्यांच्या बाजूने असला तरी आजच्या सामन्यात त्यांना विजयासाठी संघर्ष करावा लागू शकेल.

गत आयपीएल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात गुजरातने राजस्थानचा ११ चेंडू राखून पराभव केला आणि विजेतेपद मिळवले होते. आता साखळी सामन्यातही गुजरातची राजस्थानविरुद्ध सरशी झालेली आहे. आता दोघांचेही प्रत्येकी सहा गुण झाले आहेत, परंतु सरस निव्वळ सरासरीच्या जोरावर राजस्थान पहिल्या स्थानावर आहे; तर गुजरातचा तिसरा क्रमांक आहे.

गुजरात आणि राजस्थान यांची ताकद समसमान आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणारा हा सामना चुरशीचा होईल अशी अपेक्षा आहे. राजस्थानकडे असलेले यशस्वी जयस्वाल आणि जॉस बटलर या सलामीवीरांना रोखणे सोपे नसेल.

बटलरचा स्ट्राईक रेट तर १९६.६ असा आहे. जयस्वाल १८५ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करत आहे. राजस्थानकडे संदीप शर्मा आणि जेसन होल्डर असे वेगवान गोलंदाज असले तरी त्यांची मदार आर. अश्विन आणि युझवेंद्र चहल या फिरकी गोलंदाजांवर असणार आहे. गुजरातकडे रशीद खान विख्यात फिरकी गोलंदाज आहे.

यश दयालला संधी मिळणार?

कोलकताविरुद्धच्या सामन्यात अखेरच्या पाच चेंडूत पाच षटकार देणाऱ्या यश दयालला गुजरातने त्यानंतरच्या सामन्यात वगळले होते. मानसिक धक्क्यातून सावरण्यासाठी त्याला आम्ही विश्रांती दिली होती असे सांगण्यात आले होते; मात्र आजच्या सामन्यातही त्याला खेळवण्याची शक्यता कमी आहे.

हार्दिक पंड्या फॉर्मच्या शोधात

गुजरात संघ चारपैकी तीन सामन्यांत जिंकलेला असला, तरी कर्णधार हार्दिक पंड्याला अजून अपेक्षित सूर सापडलेला नाही. आज धावा करण्यासाठी तो निश्चितच प्रयत्न करेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamhini Ghat Accident : दोन दिवस जेवलो नाही, खूप शोधलं पण... ताम्हिणी घाटातील अपघाताचे दृश्य पाहून मृत तरुणांचे मित्र ढसाढसा रडले

Mangalwedha News : कात्राळचे शहीद जवान बाळासाहेब पांढरे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Pachod Accident : अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण जागीच ठार; पाचोड पैठण रस्त्यावरील घटना

Delhi Mumbai Express way : दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे वर आता हेलिकॉप्टरची सेवा; अपघातातील जखमींना एअरलिफ्ट करता येणार, पर्यटनालाही चालना

Latest Marathi News Update : देश-विदेशात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT