धोनी sakal
IPL

IPL 2023 : फलंदाजांकडून अपेक्षित कामगिरी नाही ; धोनी

गुजरात टायटन्स संघाने चेन्नई सुपरकिंग्सचा पाच गडी राखून पराभव केला.

सकाळ वृत्तसेवा

अहमदाबाद : आयपीएलच्या १६व्या मोसमामधील पहिल्या सामन्यात गतविजेत्या गुजरात टायटन्स संघाने चेन्नई सुपरकिंग्सचा पाच गडी राखून पराभव केला. चेन्नईच्या संघाने फलंदाजीची चांगली सुरुवात करूनही त्यांना अपेक्षित मोठी धावसंख्या उभी करता आली नाही. आमच्या खेळाडूंनी मधल्या षटकांमध्ये

चांगली फलंदाजी न केल्यामुळे चेन्नईला पराभवाचा सामना करावा लागला असल्याचे मत सीएसकेचा कर्णधार एम. एस. धोनी याने व्यक्त केले आहे. महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाड याने झंझावाती खेळी करत ९२ धावा जमा केल्या. त्याच्या आक्रमक खेळीमुळे सीएसकेची धावसंख्या २०० च्या पुढे जाईल, असे वाटत असतानाच मधल्या षटकांमध्ये त्यांच्या धावसंख्येचा गतीवर मर्यादा आली.

आयपीएलमधील पहिल्या सामन्यात फलंदाजीची चांगली सुरुवात होऊनही पराभव स्वीकारावा लागल्याने व्यथित झालेला धोनी म्हणाला, ‘‘आमची गोलंदाजी येईल, तेव्हा मैदानात मोठ्या प्रमाणात दव असेल, याची आम्हाला चांगलीच कल्पना होती. त्यामुळे धावफलकावर अजून धावसंख्या उभी केली असती, तर सामना जिंकता आला असता.

या सामन्यात ऋतुराजने चांगलीच फलंदाजी केली. त्याचे ड्राईव्ह खरेच डोळ्याचे पारणे फेडणारे असतात. ऋतुराजप्रमाणे आणखी फलंदाज पुढे येऊन आक्रमक फलंदाजी करायला आले, तर कोणत्याही संघासाठी चांगलेच असते; परंतु आमच्या फलंदाजांनी मधल्या षटकांमध्ये अपेक्षित गतीने खेळी केली नाही.

इम्पॅक्ट खेळाडूमुळे अडचण : हार्दिक पंड्या

इम्पॅक्ट खेळाडूचा नियम आणल्यापासून कर्णधार म्हणून माझे काम जास्त अवघड झाले आहे. संघात चांगले खेळाडू असले की इम्पॅक्ट खेळाडू म्हणून कोणाला घ्यायचे, हा मोठा प्रश्न कर्णधार म्हणून तुमच्यासमोर पडतो, असे मत काल झालेल्या सामन्याच्या विजयी संघाचा कर्णधार हार्दिक पंड्या याने व्यक्त केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vishalgad Qurbani Permission : किल्ले विशाळगडावर उरुस काळात सार्वजनिक ठिकाणी कुर्बानी देण्यास बंदी; मांसाहार नेण्याबाबत कोर्टाचा काय आहे आदेश?

Vishnu Sahasranama: अधिक मासात विष्णू सहस्त्रनामाचा जप का करतात? रोजही वाचण्याचे आहेत आश्चर्यकारक फायदे

Latest Marathi News Live Update : इचलकरंजीत आयपीएल क्रिकेट बेटिंग प्रकरणी भाजपच्या नगरसेवकाला अटक

Pargaon News : अष्टविनायक महामार्गावर अनेक ठिकाणी डांबर उखडून पडले खड्डे; तर महामार्गावरील अनेक बसथांब्यांची दुरावस्था झाली आहे

D.K. Shivkumar: डीके शिवकुमार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी प्रियांका गांधींचा मोठा रोल; इनसाइड स्टोरी आली समोर

SCROLL FOR NEXT