Hardik Pandya 
IPL

Hardik Pandya: हार्दिक पांड्याची मैदानात अरेरावी... स्ट्राईकवर असलेल्या खेळाडूला बोटाने इशारा

हार्दिकने आता पुन्हा एकदा नेटकऱ्यांचा रोष ओढून घेतला आहे.

धनश्री ओतारी

गतविजेत्या गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या सध्या क्रिकेट विश्वात चांगलाच चर्चेत आला आहे. आत्तापर्यंत अनेकदा क्रिकेटच्या मैदानात आपल्या सहकाऱ्यांना दिलेली वागणूक सर्वांनी पाहिलीय. हार्दिकने आता पुन्हा एकदा नेटकऱ्यांचा रोष ओढून घेतला आहे. (IPL 2023 gujrat titans captain hardik pandya angry video viral )

विजय शंकर आणि डेव्हिड मिलर यांनी ऐन मोक्याच्या क्षणी टॉप गीअरमध्ये फलंदाजी केल्यामुळे गतविजेत्या गुजरातने कोलकता नाईट रायडर्सचा सात विकेटने पराभव करून सलग तिसरा विजय मिळवला. पण हार्दिकचा एका व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होताना दिसत आहे. लाईव्ह मॅचदरम्यान, पांड्याची मैदानात अरेरावी पाहायला मिळाली.

नेमकं काय घडलं?

१३ व्या ओव्हरदरम्यान, हार्दिक पांड्या गोलंदाजी करत होता. त्याच्या पहिल्या चेंडूवर अफगानिस्तान रहमानुल्लाह गुरबजने षटकार ठोकला. यानंतर तो पांड्याला नॉन स्ट्रायकर एंडवर धरून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. पण रनअपवर परतत असताना पांड्या त्याच्याकडे रागाने बोट दाखवताना दिसला. दोघांच्यात नेमकी चर्चा काय घडली हे समजू शकले नाही.

हार्दिक पांड्याची ही भूमिका पाहता चाहते त्याच्यावर नाराज झाले आहेत. टीम इंडियाचा टी-20 कर्णधार हार्दिक खूप गर्विष्ठ झाला आहे अशी प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त करण्यात येत आहे.

यापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यातही हार्दिक पांड्याने कर्णधारपद भूषवले होते. यादरम्यान विराट कोहलीला मैदानात त्याच्याशी काही बोलायचे होते, पण तो त्याचे न ऐकता निघून गेला. याआधी कॅप्टन कोहलीही संतापला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

१३ वर्षांपासून शारीरिक संबंध नाही, विकी डोनर बनवून ठेवलंय... टीव्हीच्या श्रीकृष्णाने पत्नीवर केलेले गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT