ipl 2023 lsg vs dc krishnappa gowtham-impact-player 
IPL

IPL 2023 : शेवटच्या चेंडूवर गंभीरने खेळला मोठा खेळ...! विकेट पडल्यानंतर लखनौला मिळाले 6 धावा

19.5 षटकांनंतर गंभीरने रणनीती आखली आणि...

सकाळ ऑनलाईन टीम

IPL 2023 LSG vs DC Krishnappa Gowtham Impact Player : लखनौ सुपर जायंट्सने आयपीएल 2023 च्या या हंगामात दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करून धमाका केला. लखनौच्या फलंदाजांनी आणि नंतर गोलंदाजांनी डेव्हिड वॉर्नरच्या संघाला चांगला तुडवला. केएल राहुलच्या संघाने 50 धावांनी विजय मिळवला.

विजयाचा हिरो मार्क वुड होता, त्याने 14 धावांत 5 बळी घेतले. लखनौच्या या मोठ्या विजयात संघाचा मार्गदर्शक गौतम गंभीरचाही मोठा हात होता.

शेवटच्या षटकातील शेवटच्या चेंडूवर गंभीरने मोठी खेळी खेळली. लखनौने प्रथम फलंदाजी करताना 6 गड्यांच्या मोबदल्यात 193 धावा केल्या. शेवटच्या षटकात आयुष बडोनीने चेतन साकारियाच्या 2 चेंडूंवर सलग 2 षटकार ठोकले, पण पुढच्याच चेंडूवर तो बाद झाला. लखनौने 7 चेंडूत 18 धावा ठोकल्या. लखनौने 19.5 षटकांत 187 धावा केल्या होत्या.

19.5 षटकांनंतर गंभीरने रणनीती आखली आणि आयुष बडोनीच्या जागी कृष्णप्पा गौतमला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानात उतरवले. गंभीरच्या निर्णयामुळे लखनौला शेवटच्या चेंडूवर 6 धावा मिळाल्या. गौतमने शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकला.

लखनौने दिलेल्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना दिल्लीचा संघ 20 षटकांत केवळ 143 धावाच करू शकला. वुडने 5 वर्षांनी आयपीएलमध्ये पुनरागमन केले आणि पहिल्याच सामन्यात लखनौला मोठा विजय मिळवून दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT