ipl 2023 makes crorepati 
IPL

IPL 2023 ने बनवले करोडपती! शेतकऱ्याच्या मुलाच्या खात्यात अचानक आले 2 कोटी... स्वप्न कसं पूर्ण झालं?

आता करोडपती होण्यासाठी KBC मधील नंबरची वाट पाहण्याची गरज नाही कारण...

Kiran Mahanavar

IPL 2023 : आता करोडपती होण्यासाठी KBC मधील नंबरची वाट पाहण्याची गरज नाही. आयपीएल दरम्यानही तुम्ही करोडो रुपये जिंकू शकता, फक्त तुमचा अंदाज आणि नशिबाने साथ दिली पाहिजे.

बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यात एका शेतकऱ्याच्या मुलाने ड्रीम-11 गेममध्ये केवळ 49 रुपये दोन वर्षे खर्च केली आणि आता तो रातोरात करोडपती झाला आहे. दोन कोटी रुपयांचे बक्षीस जेव्हा त्याच्या बँक खात्यावर आले, तेव्हा केवळ या मुलालाच नाही तर संपूर्ण कुटुंबाला आनंदावर विश्वास बसत नव्हता.

बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यात सारंगपूर पश्चिम पंचायतीच्या एका शेतकऱ्याच्या मुलाचे नशीब ज्या प्रकारे उघडले आहे, त्यामुळे आयपीएल सुरू होताच तरुणांमध्ये करोडपती होण्याचे स्वप्न जागृत झाले आहे.

शेतकरी योगेंद्र साहनी यांचा मुलगा मंजय गेल्या 2 वर्षांपासून करोडपती होण्याचे स्वप्न पाहत होता. दोन वर्षांनंतर तो दिवस आला जेव्हा तो एका सकाळी उठला आणि त्याच्या खात्यात अचानक दोन कोटी रुपये जमा झाले.

मंजय हा मध्यमवर्गीय कुटुंबातील असल्याचं सांगण्यात येत आहे. वडील योगेंद्र साहनी गावात शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. योगेंद्रने सांगितले की, कुटुंबातील अडचणींमुळे मंजयनेही कमावण्याचे ठरवले आणि जास्त मजुरी मिळत असल्याने मित्रांसोबत गुवाहाटीला गेले. त्यांनी तिथे चित्रकार म्हणून काम करायला सुरुवात केली.

गुवाहाटीमध्येच त्याने त्याच्या मित्रांना ड्रीम-11 खेळताना पाहिले आणि स्वतः या मोबाईल अॅपवर हा गेम खेळायला सुरुवात केली. योगेंद्रच्या म्हणण्यानुसार, मंजय दोन वर्षांपासून नशीब आजमावत होता.

रँक वनमध्ये 49 रुपये गुंतवल्यानंतर त्याचे नशीब बदलले. याआधीही जिल्ह्यातील वारिसनगर ब्लॉकमधील कसूर गावातील चौकीदाराच्या मुलाने 49 लावून दोन कोटी जिंकले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

City Disfigurement Award : ‘शहर विद्रूपीकरण पुरस्कार’ भाजप नगरसेवकांना; स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंना प्रथम, सुतारांना द्वितीय, तर पांडेंना तृतीय

Pune Shivajinagar Court Firing Health Update : "पुढचे ७२ तास अत्यंत महत्त्वाचे!" शिवाजीनगर कोर्टाबाहेर हल्ला झालेल्या मंदार किवळेची प्रकृती चिंताजनक; ससूनच्या अधिष्ठात्यांकडून महत्त्वाची माहिती

Online Gaming: PUBG मधून जुळली मैत्री; मग प्रेमाचे नाटक! गेमिंग पार्टनरनेच तरुणीचा गळा आवळला

26/11 Mumbai Attack 18th Anniversary : लाठी घेऊन कसाबच्या गोळ्या अंगावर झेलणारे तुकाराम ओंबळे अन् 'ती' ६० तासांची काळी रात्र! १८ वर्षांनंतरही मुंबईच्या जखमा ताज्या; तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणानंतर कुठवर पोहोचला न्याय?

Meta Congress Meeting Controversy : 'मेटा भाजप का बेटा', मेटा-काँग्रेस बैठकीत जोरदार खडाजंगी! राहुल गांधींच्या पोस्टवर निर्बंध येत असल्याचा काँग्रेसचा आरोप; भारतीय कायद्यांचे पालन करत असल्याचे मेटाचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT