MI vs SRH
MI vs SRH esakal
IPL

MI vs SRH : ग्रीनचे शानदार शतक, मुंबईने हैदराबादचा 8 विकेट्स राखून पराभव करत प्ले ऑफच्या दिशेने केली कूच

Kiran Mahanavar

MI vs SRH Live Score : मुंबई इंडियन्सने सनराईजर्स हैदराबादचा 8 विकेट्स आणि 12 चेंडू राखून पराभव करत आपले प्ले ऑफचे आव्हान जिवंत ठेवले. मुंबईकडून महागड्या कॅमरून ग्रीनने आपले टी 20 मधील पहिले वहिले शतक ठोकत हा विजय साकारला. ग्रीनने 47 चेंडूत नाबाद शतक ठोकले. त्याने विजयासाठी आणि त्याच्या शतकासाठी 1 धावेची गरज असताना चौकार मारला. मुंबईकडून कर्णधार रोहित शर्माने 56 धावांची अर्धशतकी खेळी करत ग्रीनसोबत दुसऱ्या विकेटसाठी 124 धावांची धडाकेबाज भागीदारी रचली.

प्ले ऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी मुंबई इंडियन्स आपले सर्वस्व पणाला लावलत असतानाच सनराईजर्स हैदराबादच्या सलामीवीरांनी 140 धावांची धडाकेबाज सलामी देत मुंबईची हवा टाईट केली होती. मात्र अखेरच्या 5 षटकात मुंबईच्या आकाश माधवालने दमदार आणि वेगवान मारा करत सनराईजर्स हैदराबादच्या धावांना ब्रेक लावला. त्याने 4 षटकात 37 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. हैदराबादकडून मयांक अग्रवालने 83 तर युवा सलामीवीर विवरांत शर्माने 69 धावा ठोकल्या.

रोहित बाद 

मुंबई इंडियन्सने सामन्यावर आपली पकड मजबूत केली असे वाटत असतानाच दागरने रोहित शर्माला 56 धावांवर बाद करत ग्रीन आणि रोहितची 124 धावांची भागीदारी तोडली. यानंतर ग्रीनने डावाची सूत्रे आपल्या हातात घेतली. त्याने सूर्यकुमारसोबत अर्धशतकी भागीदारी रचत संघाला 17 व्या षटकातच 190 धावांच्या पार पोहचवले. याचबरोबर ग्रीन आपल्या शतकाजवळ पोहचला होता. त्याने भुवनेश्वर कुमारला त्याने चौकार मारत मुंबईचा विजय आणि स्वतःचे पहिले आयपीएल शतक साकारले.

मुंबईची दमदार सुरूवात 

सनराईजर्स हैदराबादने ठेवलेल्या 201 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सने दमदार सुरूवात केली. इशान किशन 14 धावांवर बाद झाल्यानंतर आलेल्या कॅमरून ग्रीनने पहिल्यापासूनच आक्रमक फटकेबाजी करण्यास सुरूवात केली. दुसऱ्या बाजूने रोहित शर्मा सावध फलंदाजी करत भागीदारी वाढवण्याच्या प्रयत्नात दिसला.

या दोघांनी पॉवर प्लेमध्ये 60 धावा ठोकल्या. पॉवर प्लेनंतर रोहितनेही आपला गिअर बदलला. दरम्यान, कॅमरून ग्रीनने आपले अर्धशतक 20 चेंडूत पूर्ण केले. या दोघांनी नवव्या षटकातच मुंबईला शंभरी पार करून दिली. या दोघांनी आपली भागीदारी शतकी केली. रोहितनेही अर्धशतक पूर्ण केले.

अग्रवालचीही माधवालने केली शिकार 

मयांक अग्रवाल मुंबईसाठी धोक्याची घंटा वाजवत असतानाच आकाश माधवालने त्याला 83 धावांवर बाद करत हैदराबादचा सेट झालेला फलंदाज स्लॉग ओव्हरमध्ये बाद केला. मयांक अग्रवालने 8 चौकार आणि 4 षटकारांच्या सहाय्याने 46 चेंडूत 83 धावा केल्या.

यानंतर ग्लेन फिलिप्स देखील 1 धाव करून जॉर्डनची शिकार झाला. त्यानंतर माधवालने पुन्हा एखदा मुंबईसाठी कमाल केली. त्याने 19 व्या षटकात क्लासेनला 18 धावांवर बाद केले. आपल्या स्पेलच्या शेवटच्या चेंडूवर ब्रुकचा शुन्यावर त्रिफळा उडवत आपली चौथी शिकार केली. यानंतर शेवटचे षटक टाकणाऱ्या जॉर्डनने 14 धावा देत हैदराबादला 200 धावांपर्यंत पोहचण्यास मदत केली.

अखेर माधवालने दिलासा दिला. 

डावाच्या 13 व्या षटकापर्यंत मुंबईला एकही विकेट मिळवता आली नाही. मात्र 14 व्या षटकात माधवालने विवरांतला 69 धावांवर बाद करत मुंबईला पहिले यश मिळवून दिले. विवरांत बाद झाला त्यावेळी हैदराबादने 13.5 षटकात 140 धावा केल्या होत्या.

मात्र हा दिलासा मुंबईला फार काळ आनंद देऊन गेला नाही. सेट झालेल्या मयांक अग्रवालने आक्रमक फटकेबाजी सुरू केली. त्याला साथ देण्यासाठी हेंन्रिच क्लासेन क्रिजवर आला होता. या दोघांनी 16 व्या षटकात हैदराबादला 168 धावांपर्यंत पोहचवले.

13 षटके अन् 130 धावा झाल्या तरी मुंबईला एकही विकेट घेता नाही आली. 

सनराईजर्स हैदराबादचे सलामीवीर मयांक अग्रवाल आणि विवरांत शर्मा यांनी पॉवर प्लेमध्ये हैदराबादला अर्धशतकी मजल मारून दिली होती. या जोडीने आपली ही अर्धशतकी सलामी शतकी भागीदारीत बदलली. विवरांतने आक्रमक अर्धशतक ठोकत हैदराबादला शतकी मजल मारून दिली. त्यानंतर संपूर्ण हंगाम आऊट ऑफ फॉर्म असलेल्या मयांकनेही आपले अर्धशतक पूर्ण करत गिअर बदलला. या दोघांनी 13 व्या षटकात हैदराबादल 130 धावांपर्यंत पोहचवले. मुंबईने आपले सहा गोलंदाज वापरूनही 13 व्या षटकापर्यंत एकही विकेट घेण्यात यश आले नाही.

MI vs SRH Live Score : हैदराबादचे मुंबईवर वर्चस्व! पॉवरप्लेमध्ये बदले 5 गोलंदाज; रोहित विकेटच्या शोधात

मयंक अग्रवाल आणि विव्रत शर्मा यांनी अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली आहे. विव्रत 27 धावा करून खेळत आहे. मयंक 21 धावा करून क्रीजवर उभा आहे. हैदराबादने 6 षटकांत 53 धावा केल्या आहेत. रोहितने पॉवरप्लेमध्ये 5 गोलंदाज बदले. मुंबईचे गोलंदाज विकेटच्या शोधात आहेत.

MI vs SRH Live Score : बालेकिल्ल्यात नाणेफेक जिंकून रोहितने घेतला हा निर्णय!

सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या करो किंवा मरोच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

Hardik Pandya MI vs KKR : पांड्यानं केली मोठी चूक; त्याच्यामुळेच मुंबईची ही अवस्था... इरफाननं कॅप्टन हार्दिकवर साधला निशाणा

RBI: मोदी सरकार बायबॅक करणार 40 हजार कोटींचे सोवेरियन बाँड, आरबीआयची माहिती; गुंतवणूकदारांचे काय होणार?

"माझी लाडकी जिवंत आहे", आई 3 दिवस मुलीच्या मृतदेहासोबत झोपली! पोलीस आले अन्...

Latest Marathi News Live Update : उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या सुरक्षेत वाढ

SCROLL FOR NEXT