ipl 2023-mumbai-indians 
IPL

IPL 2023: '17.50 कोटी रुपये पाण्यात...', या फ्लॉप खेळाडूने एकट्याने मुंबई इंडियन्सला बुडवले...

RCBची सुरुवात अफलातून! तर MIला सलामीच्या लढतीत निराशाजनक कामगिरी अन्...

सकाळ ऑनलाईन टीम

IPL 2023 Mumbai Indians : विराट कोहली व कर्णधार फाफ ड्युप्लेसिस या दोघांच्या झंझावाती फलंदाजीसमोर मुंबई इंडियन्सचा पालापाचोळा झाला. रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाने रविवारी झालेल्या आयपीएलच्या लढतीत मुंबई इंडियन्सवर 8 विकेट व 22 चेंडू राखून विजय मिळवला. एकीकडे रॉयल चॅलेंजर्स बंगळूरची सुरुवात अफलातून झाली, तर दुसरीकडे मुंबई इंडियन्सला सलामीच्या लढतीत निराशाजनक कामगिरीला सामोरे जावे लागले.

या सामन्यात एका फ्लॉप खेळाडूने एकट्याने मुंबई इंडियन्स संघाची लूट केली. आयपीएल 2023 च्या लिलावात मुंबई इंडियन्स संघाने या खेळाडूला 17.50 कोटी रुपयांना खरेदी केले होते, परंतु हा खेळाडू त्याच्या खराब कामगिरीमुळे रोहित शर्माच्या संघासाठी सर्वात मोठा खलनायक ठरला.

मुंबई इंडियन्सने 17.50 कोटी रुपये खर्च करून ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू कॅमेरून ग्रीनचा IPL 2023 च्या मोसमासाठी आत्मविश्वासाने आपल्या संघात समावेश केला होता, परंतु हा पैसा आता पाण्यासारखा वाया जात असल्याचे दिसत आहे. आयपीएलसारख्या खडतर टी-20 क्रिकेट लीगमध्ये 17.50 कोटी रुपयांची कॅमेरून ग्रीनचा पर्दाफाश झाला आहे.

रविवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध खेळल्या गेलेल्या आयपीएल सामन्यात मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू खेळाडू कॅमेरून ग्रीनला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवण्यात आले होते, मात्र तो 4 चेंडूत केवळ 5 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.

मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू कॅमेरून ग्रीनला रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा वेगवान गोलंदाज रीस टोपलीने बाद केले. कॅमेरून ग्रीन 5 धावा करून बाद झाला. यानंतर गोलंदाजीतही कॅमेरून ग्रीनची खराब कामगिरी दिसून आली आहे.

कॅमेरून ग्रीनने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरविरुद्ध गोलंदाजी करताना 2 षटकांत 30 धावा दिल्या. कॅमेरून ग्रीनला केवळ एक विकेट मिळाली असली तरी, त्याने 15.00 च्या इकॉनॉमी रेटने धावा लुटल्या आणि मुंबई इंडियन्स संघाला बुडवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026: हॉकीत भारतच आशियाचा राजा! महिलांनंतर पुरुष संघानेही जिंकलं गोल्ड मेडल; ऑलिम्पिक तिकीटही पक्के

Pune Teachers MLC election : महायुतीचे विधान परिषद जागावाटप निश्चित; हायव्होल्टेज पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपच्या वाट्याला; मंगेश चिवटे बंडखोरी करणार

Dilip Walse Patil : आंबेगाव तालुक्याच्या पुर्व भागातील लोणी-धामणी परिसरात दुष्काळाची तीव्रता जास्त; शासनाने नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याची कार्यवाही सुरु केली

Sandeep Kshirsagar: आजीच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला आमदार क्षीरसागर जाणार नाहीत; 'त्या' व्यक्तीचं नाव पत्रिकेत येताच बीडचं राजकारण तापलं

Latest Marathi News Live Update : आरोपी नीलेश आरते याला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन

SCROLL FOR NEXT