ipl 2023 mumbai indians captain rohit sharma on jasprit bumrah 
IPL

IPL: आम्हाला बुमराहशिवाय...रोहित शर्माच्या वक्तव्याने क्रिकेट विश्वात खळबळ

मुंबईला यंदाच्या वर्षी देखील पहिल्याच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला

धनश्री ओतारी

मुंबई इंडियन्सने त्यांच्या पराभवाची परंपरा कायम ठेवली आहे. मुंबईला यंदाच्या वर्षी देखील पहिल्याच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. या पराभवानंतर कॅप्टन रोहित शर्माने वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहसंदर्भात खळबळजनक वक्तव्य केलं आहे. त्याच्या विधानामुळे क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. (ipl 2023 mumbai indians captain rohit sharma on jasprit bumrah )

रॉयल चॅलेंजर बंगळूरूने मुंबईचा 8 विकेट्सने पराभव केलाय. यानंतर रोहित शर्माने माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्याने जसप्रीम बुमराहच्या अनुपस्थितीवर भाष्य केलं आहे. 'गेल्या सहा ते आठ महिन्यांपासून आम्हाला जसप्रीत बुमराहशिवाय खेळण्याची सवय आहे.

अर्थात हा वेगळा सेटअप आहे पण कोणीतरी पुढाकार घेऊन पुढं जाणं आवश्यक आहे. असे सांगत, आम्ही त्यावर अवलंबून राहू शकत नाही, असं थेट वक्तव्य रोहित शर्माने केले आहे. रोहितच्या वक्तव्यानंतर क्रिकेट विश्वात खळबळ माजली आहे.

बुमराह याला गेल्या वर्षभरापेक्षा अधिक कालावधीपासून दुखापतीने ग्रासलं आहे. त्यामुळे बुमराहला टी 20 वर्ल्ड कप 2022 आणि त्यानंतर झालेल्या प्रत्यके सीरिजला मुकावं लागलं. त्यानंतर तो आयपीएलच्या 16 व्या हंगामापर्यंत फीट होईल, अशी अपेक्षा होती. मात्र दुखापतीमुळे बुमराहला इथेही खेळू शकत नाहीय.

तसेच, प्लेयर्सची दुखापती आपल्या नियंत्रणात नाहीत, त्यावर आम्ही फार काही करू शकत नाही. संघातील इतर खेळाडू देखील खूप प्रतिभावान आहेत. आपण त्यांना संधी द्यायला हवी, असं रोहित शर्मा म्हणालाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

SCROLL FOR NEXT