mahendra singh dhoni  mahendra singh dhoni
IPL

IPL 2023 news : महेंद्रसिंह धोनीच्या तंदुरुस्तीकडे लक्ष

चेन्नई - बंगळूरमध्ये आज दाक्षिणात्य झुंज

सकाळ वृत्तसेवा

बंगळूर : चेन्नई सुपरकिंग्स व रॉयल चॅलेंजर्स बंगळूर या दोन दाक्षिणात्य संघांमध्ये उद्या आयपीएलमधील लढत रंगणार आहे. बंगळूर येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये दोन संघांमधील लढत खेळवण्यात येणार आहे.

दोन्ही संघांना आतापर्यंत चार लढतींमधून दोनमध्ये विजय मिळवता आला असून दोन लढतींमध्ये दोन्ही संघांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. सध्या तरी दोन्ही संघ समान पातळीवर आहेत; मात्र चेन्नई सुपरकिंग्सचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या तंदुरुस्तीकडे या वेळी सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत; मात्र या लढतीत खेळणार असल्याची माहिती चेन्नई सुपरकिंग्सचे सीईओ काशी विश्‍वनाथन आनंद यांनी दिली आहे.

चेन्नईसाठी ऋतुराज गायकवाड, डेव्होन कॉनवे व अजिंक्य रहाणे हे तीन फलंदाज छान कामगिरी करीत आहेत; मात्र मधल्या फळीतील फलंदाजांना आपला खेळ उंचवावा लागेल. अंबाती रायुडू, शिवम दुबे व रवींद्र जडेजा यांना अद्याप सूर गवसला नाही. शिवमला ११८.८४ च्या सरासरीने धावा करता आल्या आहेत. चेन्नईच्या गोलंदाजांना दुखापतींनी सतावले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 4th T20I : ९ सिक्स अन् ४ फोर... शे होपचं पुन्हा वादळी शतक अन् ३ मोठे विक्रम; गेल-लुईस सगळेच मागे पडले

Graduate Teachers Constituency Election : पदवीधर, शिक्षक निवडणुकीकडे विशेष लक्ष द्या; फडणवीसांच्या नगरसेवक आमदारांना सूचना

CM Devendra Fadnavis : पाच हजार ही आत्तापर्यंतची सर्वाधिक मदत; यापूर्वी एक हजार ते पंधराशे रुपये मिळत असत

Sugarcane Rate Agitation : ऊसदराचे आंदोलन होणार तीव्र; राजू शेट्टी उद्या येणार कृष्णा कारखान्यावर

Opposition Petition: निवडणूक आयोगाच्या निर्णयावर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी; राहुल गांधींच्या याचिकेतले नेमके मुद्दे कोणते?

SCROLL FOR NEXT