Sanju Samson IPL 2023  esakal
IPL

IPL 2023 news : राजस्थान विजयासह पहिल्या स्थानी कायम

सॅमसन, हेटमायरची दमदार खेळी

सकाळ वृत्तसेवा

अहमदाबाद : कर्णधार संजू सॅमसन (६० धावा) व डावखुरा फलंदाज शिमरॉन हेटमायर (नाबाद ५६ धावा) यांच्या दमदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने रविवारी येथे झालेल्या आयपीएल लढतीत गतविजेत्या गुजरात टायटन्सवर ३ विकेट व ४ चेंडू राखून मात केली. या विजयासह राजस्थान रॉयल्सचा संघ गुणतक्त्यात पहिल्या स्थानावर कायम राहिला. हा त्यांचा चौथा विजय होता. गुजरात टायटन्सला दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले.

गुजरातकडून राजस्थानसमोर १७८ धावांचे आव्हान ठेवण्यात आले. यशस्वी जयस्वाल (१ धाव) व जॉस बटलर (०) या सलामीवीरांना अपयशाचा सामना करावा लागला. इम्पॅक्ट प्लेयर म्हणून राजस्थानच्या संघात दाखल झालेल्या देवदत्त पडीक्कल यालाही मोठी खेळी करता आली नाही. तो २६ धावांवर बाद झाला.

राशीद खानने देवदत्तला बाद केल्यानंतर रियान परागलाही पाच धावांवर पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. संजू सॅमसन व शिमरॉन हेटमायर या जोडीने राजस्थानच्या विजयाची आशा कायम ठेवली. कर्णधार सॅमसन याने ३२ चेंडूंमध्ये ३ चौकार व ६ षटकारांसह ६० धावांची खेळी केली.

नूर अहमद याच्या गोलंदाजीवर आक्रमक फलंदाजी करण्याच्या नादात सॅमसन बाद झाला. त्यानंतर हेटमायर याने २६ चेंडूंमध्ये नाबाद ५६ धावा करीत राजस्थानच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

दरम्यान, याआधी राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर रिद्धीमान साहा ४ धावांवर बाद झाला. साई सुदर्शनही २० धावांवर धावचीत झाला. सलामीवीर शुभमन गिल व कर्णधार हार्दिक पंड्या यांनी गुजरातचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दोघांनी ५९ धावांची भागीदारी रचली. ही जोडी स्थिरावणार असे वाटत असतानाच युझवेंद्र चहल याने हार्दिकला २८ धावांवर बाद केले.

संक्षिप्त धावफलक

गुजरात टायटन्स २० षटकांत ७ बाद १७७ धावा (शुभमन गिल ४५, साई सुदर्शन २०, हार्दिक पंड्या २८, डेव्हिड मिलर ४६, अभिनव मनोहर २७, संदीप शर्मा २/२५) पराभूत वि. राजस्थान रॉयल्स १९.२ षटकांत ७ बाद १७९ धावा (संजू सॅमसन ६०, शिमरॉन हेटमायर नाबाद ५६, मोहम्मद शमी ३/२५).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT