Mohammad Amir Tweet Viral 
IPL

Virat Kohli : पाकिस्तानी खेळाडूच्या ट्वीटने उडाली खळबळ, विराटसाठी केलं असं काही ट्वीट की...

Kiran Mahanavar

Mohammad Amir Tweet Viral Virat Kohli : आयपीएलमध्ये चार वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर सहावे शतक झळकावणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विराट कोहलीने काही दिवसांनंतर रविवारी पुन्हा शतक झळकावले. विराटचे आयपीएल कारकिर्दीतील हे सातवे शतक होते. आरसीबीच्या होम ग्राउंड चिन्नास्वामी स्टेडियमवर गुजरात टायटन्सविरुद्ध त्याने हे शतक झळकावले.

विराटने 61 चेंडूत नाबाद 101 धावांची खेळी केली. या शतकासह विराटने ख्रिस गेलचा आयपीएलमध्ये सर्वाधिक सहा शतकांचा विक्रम मोडला. या शतकानंतर विराटवर जगभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे, तर पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमीरनेही ट्विट करत अभिनंदन केले.

आमिरने ट्विटरवर लिहिले की, 'क्रिकेटच्या खऱ्या राजाच्या बॅटमधून शंभर नंबर 82. महत्त्वाच्या सामन्यात त्याने किती चांगली खेळी केली. खरा चॅम्पियन आणि लाखो लोकांसाठी प्रेरणा. याआधीही आमिरने विराटला सहाव्या शतकासाठी शुभेच्छा दिल्या होत्या.

आपल्या ट्विटमध्ये आमिरने विराटच्या खेळीचे कौतुक करत त्याला क्रिकेटचा खरा बादशाह म्हटले आहे. आता विराटच्या सलग दुसऱ्या शतकावरही आमिरने त्याच्या फलंदाजीचे कौतुक केले आणि अनेकांची प्रेरणाही सांगितली.

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, आयपीएल 2023च्या पहिल्या सामन्यात चेन्नईचा पराभव करणाऱ्या गुजरात टायटन्सने शेवटच्या साखळी सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सहा विकेट्स राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने पाच गडी गमावून 197 धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरातने 19.1 षटकांत चार गडी गमावून 198 धावा केल्या आणि सामना जिंकला. बंगळुरूकडून विराट कोहलीने नाबाद 101 धावांची खेळी केली. त्याचवेळी गुजरातकडून शुभमन गिलने नाबाद 104 धावांची खेळी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

City Disfigurement Award : ‘शहर विद्रूपीकरण पुरस्कार’ भाजप नगरसेवकांना; स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंना प्रथम, सुतारांना द्वितीय, तर पांडेंना तृतीय

Pune Shivajinagar Court Firing Health Update : "पुढचे ७२ तास अत्यंत महत्त्वाचे!" शिवाजीनगर कोर्टाबाहेर हल्ला झालेल्या मंदार किवळेची प्रकृती चिंताजनक; ससूनच्या अधिष्ठात्यांकडून महत्त्वाची माहिती

Online Gaming: PUBG मधून जुळली मैत्री; मग प्रेमाचे नाटक! गेमिंग पार्टनरनेच तरुणीचा गळा आवळला

26/11 Mumbai Attack 18th Anniversary : लाठी घेऊन कसाबच्या गोळ्या अंगावर झेलणारे तुकाराम ओंबळे अन् 'ती' ६० तासांची काळी रात्र! १८ वर्षांनंतरही मुंबईच्या जखमा ताज्या; तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणानंतर कुठवर पोहोचला न्याय?

Meta Congress Meeting Controversy : 'मेटा भाजप का बेटा', मेटा-काँग्रेस बैठकीत जोरदार खडाजंगी! राहुल गांधींच्या पोस्टवर निर्बंध येत असल्याचा काँग्रेसचा आरोप; भारतीय कायद्यांचे पालन करत असल्याचे मेटाचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT