IPL 2023 
IPL

IPL 2023: हार्दिक पांड्याचा Live सामन्यात रुद्रावतार; VIDEO तुफान व्हायरल

लाईव्ह मॅचमध्ये हार्दिक पांड्याचा पारा चढला

धनश्री ओतारी

गुजरात टायटन्सचा कर्णधार आणि अष्टपैलु खेळाडू हार्दिक पांड्या सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. त्याचा लाईव्ह सामन्यादरम्यानचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होताना दिसत आहे. त्यामध्ये पांडा आपल्या संघातील खेळाडूंवर चिडला असल्याचे दिसत आहे. (IPL 2023 PBKS vs GT live match hardik pandya angry on mohit sharma)

पंजाबविरोधात गुरुवारी झालेल्या सामन्यातील एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये पांड्या सहकारी खेळाडूंवर संतापला आहे. पांड्याची ही भूमिका पाहून सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

मैदानात नेमकं काय घडलं?

गुरुवारी झालेल्या सामन्यात पंजाबने प्रथम फलंदाजी केली. यावेळी 20 व्या ओव्हरमध्ये कर्णधार हार्दिक पांड्याने जलद गोलंदाज जोशुआ लिटलकडे चेंडू सोपवला. ही ओव्हर पूर्ण होण्याआधी गुजरात टायटन्स संघ वेळेत ओव्हर्स पूर्ण करु शकला नव्हता.

ओव्हरचा दुसरा चेंडू टाकला जात असताना डीप कव्हरला क्षेत्ररक्षण करणारा मोहित शर्मा आपल्या जागेपासून थोडा लांब उभा होता.

मोहित शर्मा आपल्या निर्धारित ठिकाणी उभा नसल्याचं पाहून कर्णधार हार्दिक पांड्याचा पारा चढला. यानंतर त्याने मोहित शर्माला इशारा करत खडे बोल सुनावले असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. हार्दिक पांड्या यावेळी प्रचंड संतापला होता. व्हिडीओमध्ये हार्दिक पांड्याचा हा रुद्रावतार पाहून एकच चर्चा रंगली आहे.

पंजाब किंग्जने गतविजेत्या गुजरातसमोर फक्त 154 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र ते आव्हान पार करतानाही गुजरात टायटन्सला घाम फुटला. अखेर शुभमन गिलने किल्ला शेवटच्या षटकापर्यंत लढवत 49 चेंडूत 67 धावा केल्या.

मात्र तो बाद झाला त्यावेळी सामना 4 चेंडूत 6 धावा असा आला होता. अखेर विजयासाठी 2 चेंडूत 4 धावांची गरज असताना तेवतियाने चौकार मारत सामना जिंकून दिला. शुभमन गिलने 49 चेंडूत 67 धावा केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

SCROLL FOR NEXT