CSK IPL 2023 Playoffs Scenario Marathi
CSK IPL 2023 Playoffs Scenario Marathi 
IPL

IPL 2023 : धोनीची चेन्नई सुपर किंग्ज प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर?, समजून घ्या प्ले-ऑफचे समीकरण

Kiran Mahanavar

IPL 2023 Playoffs Scenario : इंडियन प्रीमियर लीग 2023 मध्ये 61 सामने खेळल्या गेले आहेत तरी असून प्लेऑफचे चित्र काही स्पष्ट झालेले नाही. लीग स्टेजच्या शेवटच्या आठवड्यात दिल्ली कॅपिटल्स (DC) वगळता उर्वरित 9 संघांच्या आशा पल्लवीत आहेत.

तत्पूर्वी, रविवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) राजस्थान रॉयल्स (RR) आणि कोलकाता नाइट रायडर्सने (KKR) चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) पराभव करून प्लेऑफची शर्यत अधिक मनोरंजक बनवली आहे. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज (CSK) देखील प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडण्याची शक्यता आहे.

इंडियन प्रीमियर लीग 2023 मध्ये शेवटच्या आठवड्यात राहिलेले सामने -

  • 15 मे 2023 – गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद.

  • 16 मे 2023 - लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स.

  • 17 मे 2023 – पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स.

  • 18 मे 2023 - सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू.

  • 19 मे 2023 – पंजाब किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स.

  • 20 मे 2023 - दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज.

  • 20 मे 2023 - कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स.

  • 21 मे 2023 - मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद.

  • 21 मे 2023 - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध गुजरात टायटन्स.

प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी चेन्नई सुपर किंग्जला दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध (DC) विजयाची नोंद करणे आवश्यक आहे. जर संघाने शनिवारी (20 मे) शेवटचा साखळी सामना जिंकला तर तो थेट बाद फेरीत जातील.

जर मुंबई इंडियन्सने लखनौ सुपर जायंट्स आणि सनरायझर्स हैदराबादविरुद्ध त्यांचे उर्वरित दोन सामने जिंकले तर त्यांचे 18 गुण होतील, तर CSK चे जास्तीत जास्त 17 गुण होऊ शकतात. अशा स्थितीत चेन्नईचा संघ टॉप 2 मध्ये पोहोचू शकणार नाही.

लखनौ संघाने मुंबई आणि कोलकाताला पराभूत केल्यास त्यांचे 17 गुण होतील. अशा स्थितीत गुजरात संघाने दोन्ही सामने गमावले तर चेन्नई आणि लखनौ संघ 1 आणि 2 नंबरवर राहतील. गुजरातने दोन्ही सामने गमावले आणि मुंबईने दोन्ही सामने जिंकले तर रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ पहिल्या क्रमांकावर असेल. शेवटचा सामना जिंकून चेन्नई दुसऱ्या क्रमांकावर असेल.

गुजरातचे आधीच 16 गुण आहेत. दोन्ही सामने जिंकून ती 20 गुणांपर्यंत पोहोचू शकते. मुंबई, लखनौचे प्रत्येकी दोन सामने आहेत, एकही जिंकल्यास त्यांना 16 किंवा त्याहून अधिक गुण मिळतील. मात्र दोघांनाही एकमेकांविरुद्ध वन ऑन वन सामने खेळावे लागणार आहेत. या सामन्यात मुंबई हरली तर केवळ 16 गुणांपर्यंत पोहोचू शकेल. लखनौला पराभव पत्करावा लागला तर ते केवळ 15 गुणांपर्यंत पोहोचू शकेल. आरसीबी आणि पंजाबचेही 16-16 गुण होऊ शकतात. यासाठी त्यांना दोन्ही सामने जिंकावे लागतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: दिल्लीच्या विजयानं राजस्थानला मिळालं प्लेऑफचं तिकीट! आता उरलेल्या 2 जागांसाठी 5 संघात शर्यत, पाहा समीकरण

IPL 2024 DC vs LSG: दिल्लीने लखनौला मात देत राखला घरचा गड अन् स्पर्धेतील आव्हानही कायम; इशांतचा भेदक मारा ठरला निर्णायक

Chhagan Bhujbal: कोसळलेल्या होर्डिंगशी ठाकरेंचा काय संबंध? भुजबळांचा सरकारला घराचा आहेर

Animals computation: यंदा बुद्ध पोर्णिमेला होणार नाही प्राणी गणना! वरिष्ठांकडून कान उघडणी; काय घडलंय नेमकं?

Ghatkopar hoarding : 'जीव वाचला पण रोजी रोटी गेली'; गंभीर जखमी झालेले टॅक्सी चालक सुभेदार मोर्या यांची व्यथा

SCROLL FOR NEXT