LSG vs MI IPL 2023 Playoffs Scenarios  
IPL

IPL 2023 Playoffs Scenarios : लखनऊसाठी शेवटची संधी! मुंबई हरवल्यास प्ले-ऑफ मधुन होणार का बाहेर? जाणुन घ्या समीकरण

हा सामना दोन्ही संघांसाठी करा किंवा मरो असा आहे पण...

Kiran Mahanavar

LSG vs MI IPL 2023 Playoffs Scenarios : आयपीएल 2023 मध्ये मंगळवारी लीगच्या 63 व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सचा सामना मुंबई इंडियन्सशी होणार आहे. हा सामना लखनऊच्या एकना स्टेडियमवर खेळल्या जाणार आहे. मुंबई आणि लखनऊचे संघ गुणतालिकेत अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत.

हा सामना दोन्ही संघांसाठी करा किंवा मरो असा आहे. पराभूत संघासाठी पुढील वाटचाल कठीण होईल. यासोबतच विजेत्या संघाचा प्लेऑफमध्ये पोहोचण्याचा मार्ग मोकळा होईल. दोन्ही संघ हा सामना व्हर्च्युअल नॉकआऊटप्रमाणे खेळतील.

मुंबई आणि लखनऊ या दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 12-12 सामने झाले आहेत. मुंबईने सात सामने जिंकले आणि पाच गमावले. संघाचे 14 गुण आहेत. रोहितचा पलटण जिंकल्यास त्याचे 16 गुण होतील आणि संघ जवळजवळ प्लेऑफसाठी पात्र होईल. त्याचा शेवटचा सामना खराब फॉर्ममध्ये असलेल्या सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्ध आहे.

त्याचबरोबर लखनऊनेही आतापर्यंत 12 सामने खेळले आहेत. यामध्ये संघाने सहा जिंकले तर पाच पराभव पत्करले. चेन्नईविरुद्धचा सामना पावसाने वाहून गेला. लखनऊचा संघ जिंकल्यास त्याचे 15 गुण होतील. दोघांमध्ये आज रंजक स्पर्धा पाहायला मिळणार आहे.

या हंगामात दोन्ही संघ पहिल्यांदाच भिडणार आहे. यापूर्वी दोन्ही संघ गेल्या मोसमात दोनदा आमनेसामने आले होते. त्यात लखनऊने दोन्ही सामने जिंकले. लखनऊने एक सामना 18 धावांनी तर दुसरा सामना 36 धावांनी जिंकला. कृणालच्या संघाला ही लय कायम राखायची आहे. विशेष म्हणजे क्रुणाल त्या संघाविरुद्ध खेळणार आहे ज्यापासून त्याने आयपीएल करिअरला सुरुवात केली होती.

दोन्ही संघांचे संभाव्य प्लेइंग-11

लखनऊ सुपर जायंट्स : क्विंटन डिकॉक, काइल मेयर्स, प्रेरक मंकड, मार्कस स्टोइनिस, निकोलस पूरन, क्रुणाल पांड्या, आयुष बडोनी, कृष्णप्पा गौतम, युधवीर चरक, रवी बिश्नोई, अमित मिश्रा, आवेश खान.

मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा, इशान किशन, कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, नेहल वढेरा, टीम डेव्हिड, विष्णू विनोद, पीयूष चावला, ख्रिस जॉर्डन, कुमार कार्तिकेय, जेसन बेहरेनडॉर्फ.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandharpur Ashadhi Ekadashi Live Updates : पंढरपूर प्रवेशावेळी वाहतुकीची ऐशी की तैशी; वाहनांचा पालखी सोहळ्यांना नाहक त्रास

PM Modi Instagram Video : 'थँक्यू फ्रेंड्स!' नीट पेपरफुटीच्या वादावर पंतप्रधान मोदींचा तरुणांना मध्यरात्री नवा मेसेज; Instagram वर व्हिडिओ पोस्ट करत काय म्हणाले पीएम?

मोदी सरकारचा एक निर्णय, 2 पालखी मार्गांसाठी मिळाले 12 हजार 41 कोटी! 365 किमी मार्गांमुळे पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन सुलभ; पालखी मार्गांची वैशिष्ट्ये काय? वाचा...

Sonam Wangchuk: सोनम वांगचुकांनी उपोषण का सोडलं? नवीन व्हिडिओतून थेट कारणच सांगितलं; म्हणाले- अशा देशावर धिक्कार...

आधी फायरिंग, नंतर हायरिंग... NTA मध्ये मोठी भरती! जनरल मॅनेजरसह यंग प्रोफेशनल्सची होणार नियुक्ती

SCROLL FOR NEXT