IPL 2023 PlayOff Scenario and Points Table
IPL 2023 PlayOff Scenario and Points Table sakal
IPL

IPL 2023 Playoff Scenario : एका सामन्यामुळे 5 संघांना बसला मोठा धक्का! जाणून घ्या प्लेऑफचे समीकरण

Kiran Mahanavar

IPL 2023 Points Table Playoff Scenario : आयपीएल 2023 मध्ये यावेळी जबरदस्त सामने खेळल्या जात आहेत. काल आरसीबीवर मुंबई इंडियन्सच्या विजयानंतर पॉइंट टेबलमध्ये उलथापालथ झाली आहे. यावेळी मुंबई इंडियन्सची सुरुवात फारशी चांगली झाली नव्हती, पण त्यानंतर हा संघ ज्या प्रकारे पुनरागमन करत आहे, त्यामुळे प्लेऑफचे समीकरण बिघडले आहे.

इतकंच नाही तर मुंबई इंडियन्सनं जिथे एका दणक्यात टॉप 4 मध्ये स्थान मिळवलं आहे, तिथे या मॅचनंतर पाच टीमचं मोठं नुकसान झालं आहे. प्लेऑफमध्ये जाण्यासाठी स्वत:ला प्रबळ दावेदार समजणाऱ्या संघांनी पुन्हा एकदा गुणाकाराची गणिते मांडण्यास सुरुवात केली आहे.

आयपीएल 2023 च्या पॉइंट टेबलबद्दल बोलायचे झाले तर, हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्स 11 पैकी 8 सामने जिंकून 16 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील सीएसकेचा संघ 13 गुणांसह विराजमान आहे. हे दोन्ही संघ प्लेऑफमध्ये जाणार हे जवळपास निश्चित दिसत आहे.

दरम्यान, मुंबई इंडियन्सने आरसीबीला हरवून तिसऱ्या क्रमांकावर कब्जा केला आहे. संघाने आतापर्यंत खेळलेल्या 11 सामन्यांपैकी सहा जिंकले आणि पाच पराभव पत्करले आहेत. म्हणजेच त्याचेही आता 12 गुण आहेत, जे CSK पेक्षा फक्त एक कमी आहे. चौथ्या क्रमांकावर लखनऊ सुपर जायंट्सचा संघ आहे.

आरसीबीला हरवून मुंबई इंडियन्सने पॉइंट टेबलमध्ये खळबळ माजवली आहे. दुसरीकडे याच सामन्यातील पराभवानंतर आता फाफ डुप्लेसीच्या नेतृत्वाखालील आरसीबी संघाचा पुढचा मार्ग कठीण झाला आहे. संघाला त्यांचे उर्वरित सर्व सामने येथून जिंकावे लागतील, एक पराभव संघाच्या सर्व आशा धुळीस मिळवण्यासाठी पुरेसा असेल.

मुंबई इंडियन्सच्या विजयामुळे लखनौ सुपरजायंट्सचे नुकसान झाले आहे, तर संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्स टॉप 4 मधून बाहेर पडला आहे. राजस्थान रॉयल्सचा संघ आपले शेवटचे सलग तीन सामने हरला आहे, त्यानंतरही ते चौथ्या क्रमांकावर विराजमान होते, मात्र आता त्यांना बाहेर पडावे लागले आहे.

लखनौ सुपरजायंट्स आणि राजस्थान रॉयल्स व्यतिरिक्त बाहेर पडलेल्या इतर तीन संघांमध्ये केकेआर, आरसीबी आणि पंजाब किंग्जचा समावेश आहे. KKR, RCB आणि पंजाब किंग्जचे प्रत्येकी दहा गुण आहेत, परंतु चांगल्या धावगतीमुळे, RR चा संघ या दहा गुणांच्या संघांमध्ये पुढे आहे.

दुसरीकडे, एडन मार्करामच्या नेतृत्वाखालील सनरायझर्स हैदराबाद आणि डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्सची अवस्था आणखी वाईट आहे. त्याचे दहा सामन्यांत आठ गुण आहेत. हे संघ टेबलच्या तळाशी असले तरी प्लेऑफचे दावेदार आहेत. एकाच सामन्यातील पराभव या दोन्ही संघांचा खेळ जवळजवळ संपुष्टात आणण्यासाठी पुरेसा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

धक्कादायक घटना! मुलीला बोटावर शस्त्रक्रियेसाठी नेले, डॉक्टरांनी चुकून केली जिभेवर शस्त्रक्रिया

बारावीचा 21 किंवा 22 मे रोजी तर दहावीचा निकाल 30 मेपूर्वी! ‘या’ संकेतस्थळांवर पाहता येईल निकाल; जुलैमध्ये अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा

Dahi Poha Recipe: सकाळच्या नाश्त्यात दही पोह्याचा घ्या आस्वाद ,जाणून घ्या रेसिपी

लोकसभा निवडणुकीत भाजप-एनडीए 400 जागा पार करणार; अंबाबाई दर्शनानंतर माजी मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान

Corona Vaccine : कोरोना प्रतिबंधक ‘कोवॅक्सिन’चेही दुष्परिणाम; बनारस हिंदू विद्यापीठातील चाचण्यांमधील निरीक्षणे

SCROLL FOR NEXT