ipl-2023-prize-money-winners-playoffs-purple-orange-cap-awards-cash cricket news 
IPL

IPL 2023 Prize Money: विजेता संघ होणार मालामाल! जाणून घ्या कोणाला मिळणार किती बक्षीस रक्कम

आयपीएल 2023 ची लीग फेरी आता संपली अन् आता...

Kiran Mahanavar

IPL 2023 Prize Money : आयपीएल 2023 ची लीग फेरी आता संपली आहे. साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यानंतर प्लेऑफसाठी संघ निश्चित जाईल आहेत. आता जेतेपदासाठी चार संघ एकमेकांशी भिडतील. जेतेपद कोणाच्या नावावर होणार हे ठरलेले नाही, पण हा चॅम्पियन जो असेल, त्याचा संघ मालामाल होणार हे मात्र नक्की आहे. क्रिकेटमधील सर्व टी-20 लीगमध्ये आयपीएलची बक्षीस रक्कम सर्वाधिक आहे.

आयपीएलचा पहिला सीझन 2008 मध्ये झाला होता. त्या वर्षी 8 संघांनी विजेतेपदासाठी स्पर्धा केली होती आणि राजस्थान रॉयल्स चॅम्पियन म्हणून उदयास आला. त्या वर्षी राजस्थान रॉयल्सला चॅम्पियन बनण्यासाठी बक्षीस फेरीत 4 कोटी 80 लाख रुपये देण्यात आले होते. याशिवाय अंतिम फेरीत राजस्थानकडून पराभूत झालेल्या चेन्नई सुपर किंग्जला उपविजेते म्हणून 2.4 कोटी रुपये देण्यात आले होते.

2008 पासून आयपीएलच्या बक्षीस रकमेत पाच पटीने वाढ झाली आहे. आयपीएल 2023 चे विजेतेपद पटकावणाऱ्या संघाला 20 कोटी रुपयांचे बक्षीस दिले जाईल. अंतिम फेरीत पराभूत होणारा संघही रिकाम्या हाताने जाणार नाही. त्याला 13 कोटी रुपयेही दिले जाणार आहेत. त्याच वेळी प्लेऑफमध्ये स्थान मिळवणाऱ्या इतर दोन संघांना 7-7 कोटी रुपये मिळतील.

आयपीएलमध्ये केवळ चॅम्पियन बनणाऱ्या संघालाच नाही तर खेळाडूंनाही अनेक पुरस्कार दिले जातात. या पुरस्कारांसाठी पारितोषिक रक्कमही दिली जाते.

  • ऑरेंज कॅप - रु 15 लाख

  • पर्पल कॅप - रु 15 लाख

  • सर्वाधिक षटकार - 12 लाख रु

  • सुपर स्ट्रायकर - रु. 15 लाख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explainer: फडणवीस आणि शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका; पण राज ठाकरेंसाठी 'मवाळ भूमिका', नेमकं समीकरण काय? वाचा सोप्या शब्दात

IND vs ENG 2nd Test: २६९, १००* ! शुभमन गिलचे शतक अन् ५४ वर्षांपूर्वीचा विक्रम उद्ध्वस्त; एकाही भारतीयाला नव्हता जमला हा पराक्रम

SBI Bank Manager Viral Video : ''तुला iPhone देईन, शारीरिक संबंध ठेव..’’ म्हणत, महिला कर्मचारीशी घृणास्पद कृत्य करणाऱ्या SBI व्यवस्थापकाचा भांडोफोड!

Yavatmal News: लाखो विद्यार्थ्यांचा खडतर प्रवास! शिक्षणासाठी खेड्यातून ‘अप-डाऊन’, सवलतीच्या पासचा दिलासा पण...

Pune Crime : ४० दिवसांच्या मुलीची साडेतीन लाखांत विक्री; आई-वडिलांसह सहा जणांना अटक

SCROLL FOR NEXT