ipl 2023 punjab kings playoff scenario 
IPL

PBKS vs DC: एक चूक अन् खेळ खल्लास! आव्हान कायम ठेवण्यासाठी पंजाबचा दिल्लीशी सामना

प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी रस्सीखेच...

Kiran Mahanavar

PBKS vs DC IPL 2023 Punjab Kings Playoff Scenario : आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील हा आठवडा प्ले ऑफसाठी महत्त्वाचा समजला जात आहे. गुजरात टायटन्सने सोमवारी सनरायझर्स हैदराबादवर विजय मिळवत प्ले ऑफमध्ये प्रवेश करणारा पहिला संघ म्हणून मान मिळवला.

आता आज पंजाब किंग्सचा संघ दिल्ली कॅपिटल्सशी दोन हात करणार असून या वेळी प्ले ऑफमध्ये पोहोचण्याचे आव्हान कायम राखण्यासाठी त्यांना सर्वस्व पणाला लावावे लागणार आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले असले, तरी प्रतिष्ठा राखण्यासाठी त्यांना उर्वरित लढतींसाठी मैदानात उतरावे लागणार आहे.

पंजाबने आतापर्यंत झालेल्या 12 लढतींमधून 6 लढतींमध्ये विजय मिळवले असून 6 लढतींमध्ये त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. आता प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी त्यांना उर्वरित दोन्ही लढतींमध्ये विजय मिळवणे आवश्‍यक आहे.

याचसोबत त्यांना मोठ्या फरकाने विजय मिळवावे लागणार आहेत. सध्या बंगळूर, राजस्थान, कोलकता व पंजाब या चार संघांचे प्रत्येकी 12 गुण झाले आहेत. त्यामुळे प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी रस्सीखेच दिसून येत आहे.

बंगळूर व पंजाब या दोन संघांच्या प्रत्येकी 12 लढती झाल्या आहेत. राजस्थान व कोलकता या दोन संघांच्या प्रत्येकी 13 लढती पार पडल्या आहेत. त्यामुळे प्ले ऑफमध्ये पोहोचण्याची अधिक संधी बंगळूर व पंजाब या दोन संघांकडे असणार आहे.

आजची लढत - पंजाब किंग्स - दिल्ली कॅपिटल्स

स्थळ - धरमशाला - वेळ - संध्याकाळी ७.३० वाजता

प्रक्षेपण - स्टार स्पोर्टस्

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT