GT vs CSK MS Dhoni IPL 2023  
IPL

GT vs CSK MS Dhoni : 'मी चेन्नईसोबत..' CSK 10व्यांदा फायनलमध्ये गेल्यानंतर धोनी झाला भावूक, म्हणाला...

कर्णधार महेंद्रसिंग धोनी पुढील हंगामात खेळणार की नाही यावर केले मोठे वक्तव्य

Kiran Mahanavar

GT vs CSK MS Dhoni IPL 2023 : आयपीएल 2023 चा पहिला क्वालिफायर सामना 23 मे रोजी चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला गेला. चेन्नईने हा सामना 15 धावांनी जिंकला आणि आयपीएल 2023 च्या अंतिम फेरीत पोहोचणारा तो पहिला संघ ठरला. चेन्नई सुपर किंग्ज 10 व्यांदा इंडियन प्रीमियर लीगच्या अंतिम फेरीत पोहोचल्यानंतर करिष्माई कर्णधार महेंद्रसिंग धोनी पुढील हंगामात खेळणार की नाही यावर मोठे वक्तव्य केले.

आयपीएल क्वालिफायरच्या पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्सवर 15 धावांनी विजय मिळवल्यानंतर जेव्हा समालोचक हर्षा भोगले यांनी धोनीला विचारले की तो पुन्हा येथे (चेन्नई) खेळणार का? धोनी म्हणाला, मला माहित नाही, माझ्याकडे निर्णय घेण्यासाठी आठ-नऊ महिने आहेत. माझ्याकडे विचार करायला पुरेसा वेळ आहे, त्यामुळे मी आत्ताच याबद्दल विचार करून डोकेदुखी वाढू करू इच्छित नाही.

चेन्नईला चार वेळा चॅम्पियन बनवणारा कर्णधार म्हणाला, मग ते चेन्नईसाठी मैदानावर खेळणे असो किंवा संघाबाहेर बसणे असो, मी चेन्नईसोबत राहणे पसंत करेन. डिसेंबर मध्ये पुढील आयपीएल लिलाव आहे. तेव्हा विचार करू. मी या वर्षी जानेवारीपासून घराबाहेर आहे, मार्चपासून सराव करतोय.

धोनीने या सीझनमध्ये असे काही संकेत दिले आहेत, ज्यामुळे तो येत्या काही वर्षांतही आयपीएलमध्ये खेळताना दिसणार असल्याचे दिसते. पहिल्या क्वालिफायर सामन्यात प्रथम फलंदाजी करताना CSK संघाने 20 षटकात 7 गडी गमावून 172 धावा केल्या आणि गुजरातसमोर 173 धावांचे लक्ष्य ठेवले. 173 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सची फलंदाजी पूर्णपणे फ्लॉप ठरली. 20 षटकात 157 धावा करून तो ऑलआऊट झाला आणि 15 धावांनी सामना गमावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM : भारत उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम, आता फक्त वेस्ट इंडिजचा अडथळा! दक्षिण आफ्रिकेचा Semi Final प्रवेश पक्का

Find Aadhaar Centers on Google : 'UIDAI'ने उचललं मोठं पाऊल! लवकरच 'गुगल मॅप'ने शोधता येणार जवळचं आधार केंद्र

Bhigwan Accident : पुणे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात तीन ठारः मृतांमध्ये वाढदिवस असलेल्या नातवाचा आई व आजीसह मृत्यू

Daund Crime : पर्स स्टेशन जवळ टाकली, शोधा अन् घेऊन जा; चोरानेच दिला सल्ला

Pune Crime : गुंड नीलेश गायवळ टोळीतील फरार आरोपीला अटक

SCROLL FOR NEXT