ipl 2023 rajat sharma take jibe at gautam-gambhir after virat kohli century in rcb vs srh tweet goes viral 
IPL

Gambhir Vs Rajat Sharma : विराटचे शतक अन् रजत शर्मांचा गंभीरला चिमटा! ट्वीट करत म्हणाले...

सकाळ डिजिटल टीम

क्रिकेटच्या दुनियेतील दोन दिग्गज खेळाडू विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील वाद मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. हे दोन दिग्गज दोन दिग्गज LSGvsRCB सामन्यानंतर एकमेकांशी भिडले होते.

त्यांच्या या भांडणानंतर या दोघांचे चाहते देखील दोन गटात विभागल्याचं पाहयला मिळालं. मात्र या वादात आता अनेक प्रसिद्ध व्यक्तींनीही भाग घेतल्याचं दिसून आलं. अशा लोकांमध्ये प्रसिद्ध न्यूज अँकर आणि डीडीसीएचे माजी अध्यक्ष रजत शर्मा हे देखील उतरले आहेत.

विराट आणि गंभीर यांच्या भांडणानंतर रजत शर्मा यांनी लगेचच त्याच्या एका टीव्ही कार्यक्रमात गौतम गंभीरचे नाव घेऊन खूप काही सांगितले होते. यानंतर गंभीरने त्याचे नाव न घेता ट्विट करत त्यांच्यावर टीका केली. आणि आता रजत शर्मा यांनी गंभीरचे नाव न घेता पुन्हा त्याच्यावर निशाणा साधला आहे.

नेमकं झालं काय?

मैदानावरच झालेल्या कोहली-गंभीर वादानंतर, खाजगी वृत्तवाहिनीचे मालक आणि डीडीसीएचे माजी अध्यक्ष रजत शर्मा यांनी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये त्याने गंभीरचे नाव घेत थेट अनेक गोष्टी सुनावल्या होत्या. यानंतर त्यांचा तो एपिसोड सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला.

त्यामध्ये रजत शर्मा म्हणताना दिसत आहेत की, गौतम गंभीरला तिखट लागलं. निवडणूक लढवून खासदार झाल्यामुळे गौतम गंभीरचा अहंकार आणखी वाढला. विराटची लोकप्रियता त्याला किती खटकते, हे काल पुन्हा एकदा मैदानात स्पष्टपणे दिसून आलं. विराट कोहली हा असा खेळाडू आहे, जो नेहमीच आक्रमक असतो.

कोणत्याही प्रकारचा मूर्खपणा खपवून घेत नाही . त्यामुळेच त्याने गौतम गंभीरला सडेतोड उत्तर दिले. पण एकंदरीत गौतम गंभीरने जे केले ते स्पोर्ट्समन स्पिरिटच्या विरोधात आहे. माजी खेळाडू किंवा संसद सदस्य म्हणून त्याच्यासाठी हे अशोभनिय आह. अशा घटनांमुळे क्रिकेटचे नुकसान होते आणि हे घडायला नको होते.

गंभीरनेही ही क्लिप पाहिली असेल. त्यावर त्यांनीही त्यांचे नाव न घेता उत्तर दिले. गंभीरने ३ मे, बुधवारी रात्री ९.१५ च्या सुमारास एक ट्विट केले. त्यांनी लिहिले,

'प्रेशर'चं कारण सांगून दिल्ली क्रिकेटमधून पळून गेलेला माणूस क्रिकेटच्या काळजीआडून सशुल्क पीआर करतोय. हाच कलीयुग आहे देथे ‘पळपुटे’ त्यांचे ‘न्यायालय’ चालवत आहेत.’

आता रजत शर्मा यांनी या प्रकरणावरून गंभीरवर पुन्हा निशाणा साधला आहे. १८ मे रोजी SRH विरुद्ध विराटच्या शतकानंतर रजत यांनी ट्विट केले की, विराटचे अप्रतिम शतक. बघायला मजा आली. साहजिकच कुठेतरी कोणीतरी आनंदी नसावे. रजतने आपल्या ट्विटमध्ये विराट कोहली आणि बीसीसीआयलाही टॅग केले. "कोई नाराज़ है तो मना लो,

बाद में ये सोच सोच कर दुख होगा कि अगर मना लेते तो अच्छा होता." असं ट्वीटही रजत शर्मा यांनी केलं आहे. यामध्ये त्यांनी कोणालाही टॅग केलं नाहीये. मात्र, त्यांच्या या ट्विटवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.

SRHvsRCB मॅचमध्ये नेमकं काय झालं?

काल झालेल्या या आयपीएल सामन्यात फाफ डु प्लेसिसने नाणेफेक जिंकून एसआरएचला प्रथम फलंदाजी साठी आमंत्रित केले. हेनरिक क्लासेनने ५१ चेंडूत १०४ धावा केल्या. प्रत्युत्तरात विराट आणि फाफ डू प्लेसिसने आरसीबीसाठी पहिल्या विकेटसाठी १७२ धावांची भागीदारी केली. संघाने आठ विकेट्स राखून सामना जिंकला. कोहलीने ६३ चेंडूत १०० तर डु प्लेसिसने ४७ चेंडूत ७१ धावा केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT