ipl 2023 rcb vs csk virat kohli shares ms dhoni photo know its meaning rohit sharma  
IPL

Virat Kohli Tweet : रोहित शर्मा खिजगणतीतच नाही! विराटनं धोनीचा फोटो शेअर करत केलं ट्वीट

रोहित कणसे

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) चा स्टार फलंदाज विराट कोहलीने चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यानंतरचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये विराट आणि महेंद्रसिंग धोनी दिसत आहेत. कोहलीने पहिल्यांदाच धोनीचा फोटो शेअर केला आहे असे नाही, पण यावेळी त्याने फोटोसोबत काही इमोजी देखील शेअर करून एक खास संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.

चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या इंडियन प्रीमियर लीग (IPL 2023) सामन्यात विराटच्या संघाचा 8 धावांनी पराभव झाला. यानंतर विराट आणि धोनीने केवळ एकमेकांना मिठीच मारली नाही तर बराच वेळ ते एकमेकांशी बोलताना देखील दिसले. विराटने शेअर केलेल्या फोटोमध्ये 2 हार्ट दिसत आहेत. एक लाल जो रॉयल चॅलेंजर्स बंगलोरसाठी आहे तर एक पिवळा हार्ट आहे जे चेन्नईसाठी आहे.

कोहलीने दोन्ही हृदयांच्या मध्ये प्लस चिन्ह दाखवत पुढे भारताचा ध्वज आणि एमएस धोनीचे नाव लिहिले आहे. सामन्यादरम्यान आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी विराटला मॅच फीच्या 10 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. आयपीएलच्या निवेदनात म्हटले आहे की कोहलीने आयपीएल आचारसंहितेच्या कलम 2.2 अंतर्गत नियमांचे उल्लंघन केले आहे. मात्र कोहलीला कोणत्या घटनेसाठी दंड ठोठावण्यात आला होता हे स्पष्ट केलेले नाही.

चेन्नई सुपर किंग्जचा मधल्या फळीतील फलंदाज शिवम दुबेला बाद केल्याचे कोहलीने अतिउत्साही रीतीने सेलिब्रेशन केले होते आणि कदाचित हे आचारसंहितेचे उल्लंघन असल्याचे मानले होते. दुबेने 27 चेंडूत 52 धावांच्या जोरावर चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना सहा बाद 226 धावा केल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Horoscope : 12 तारखेपासून सुरू होतोय गजकेसरी राजयोग! वृषभसह 4 राशीचं भाग्य उजळणार; होणार धनलाभ, प्रेमात यश, मोठं स्वप्न होईल पूर्ण

Masina Hospital Mumbai : मुंबईतील मसीना रूग्णालयात संतापजनक घटना! प्रोसेस अभावी मृतदेह आठ तास अडवून धरला

Google Search : 31 डिसेंबरच्या रात्री गुगलवर सगळ्यांत जास्त काय सर्च करण्यात आलं? धक्कादायक रिपोर्टमुळे जगभर खळबळ

Sanjay Raut : "सत्ताधारी गुंडांशिवाय निवडणूक जिंकूच शकत नाही"; पुण्यातून संजय राऊतांचा भाजप-राष्ट्रवादीवर घणाघात!

Ajit Pawar : “पुणेकरांना पाणी नाही, रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य; भाजपाच्या महापालिका राजवटीत शहराचे अतोनात नुकसान”– अजित पवार!

SCROLL FOR NEXT