IPL

IPL 2023 RCB vs GT : बंगळूरला प्ले-ऑफची अधिक संधी! गुजरात प्रमुख खेळाडूंना विश्रांती?

सकाळ ऑनलाईन टीम

IPL 2023 RCB vs GT : कर्णधार फाफ डुप्लेसीचे सातत्य आणि आता विराट कोहलीचा जबरदस्त फॉर्म यामुळे झपाटून खेळ करणाऱ्या बंगळूरचा सामना आज गतविजेत्या गुजरातविरुद्ध होत असला तरी या लढतीतून प्ले- ऑफ गाठण्याची संधी अधिक आहे.

यंदाच्या आयपीएलमधील बंगळूर आणि गुजरात हा अखेरचा साखळी सामना आहे. त्यामुळे नेमक्या किती फरकाने विजय मिळवावा लागेल ही समीकरणे त्यांच्यासाठी स्पष्ट झालेली असतील. ही बाब बंगळूरच्या पथ्यावर पडेल आणि आवश्यकतेनुसार त्यांना खेळ करता येईल.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून कधीच निवृत्त झालेला फाफ डुप्लेसी या आयपीएलमध्ये प्रथितयश खेळाडूंनाही मागे टाकेल अशी फलंदाजी करत आहे. ६०० हून अधिक धावा केल्यामुळे ऑरेंज कॅप त्याच्याकडे आहे. आता त्याच्याकडून केवळ सातत्य ठेवले तरी बंगळूरसाठी विजय कठीण नसेल. त्यात आजचा हा सामना घरच्या मैदानावर होत असल्यामुळे प्रेक्षकांचा पाठिंबा बंगळूर संघाच्या पाठीशी असेल. त्यांच्यासाठी हा बुस्टर डोस असेल.

मधल्या फळीत दिनेश कार्तिक अपयशी ठरत असला तरी ग्लेन मॅक्सवेलची बॅट तळपत आहे. त्यामुळे विराट-डुप्लेसी यांच्यानंतर बंगळूरची मदार मॅक्सवेलवर आहे. आता तर अनुज रावतही धावा करत आहे. त्यामुळे बंगळूरला मधल्या फळीची तेवढी चिंता नसेल.

गुजरात प्रमुख खेळाडूंना विश्रांती देणार?

प्ले-ऑफमधील स्थान अगोदरच निश्चित करणारा गुजरातचा संघ कॉलिफायर-१ हा सामना खेळणार हे सुद्धा निश्चित आहे. हा सामना लगेचच मंगळवारी आहे. त्यामुळे गुजरातचे संघ व्यवस्थापन प्रामुख्याने मोहम्मद शमी आणि राशीद खान यांना विश्रांती देण्याची दाट शक्यता आहे. याचा फायदा बंगळूरला निश्चितच होऊ शकेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs LSG Live: विराट कोहलीचे प्लेइंग इलेव्हनमध्ये नाव नाही, आजच्या सामन्याला मुकला? रजत पाटीदारचा महत्त्वाचा निर्णय

इतिहास जिवंत! गावकऱ्यांनी पुन्हा जगला शिवराय व महाराणी गुणवंताबाईंचा विवाह सोहळा, ३७० वर्षांपूर्वीचा 'तो' दिवस डोळ्यासमोर उभा!

MS Dhoni Fitness: महेंद्रसिंग धोनीचं ठरलं! IPL 2026 चा पहिला सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळणार; पण CSK संघात कोणाची जागा घेणार?

CBSE Class 10 Result: सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर; यंदा ९३.७० टक्के उत्तीर्ण, मुली पुन्हा आघाडीवर

Akola Summer Heatwave : अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? पारा पोहोचला ४४.२ अंशांवर; सकाळी १० नंतरच रस्ते ओस

SCROLL FOR NEXT