IPL 2023 royal challengers bangalore  
IPL

RCB IPL 2023 : मुंबईकडून पराभूत झाल्यानंतरही RCB पोहोचू शकते प्लेऑफमध्ये! जाणून घ्या संपूर्ण गणित

Kiran Mahanavar

Royal Challengers Bangalore IPL 2023 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सकडून पराभवाचा सामना करावा लागला, ज्यामुळे त्यांचा आयपीएल 2023 च्या प्लेऑफमधील मार्ग अधिक कठीण झाला आहे.

आरसीबी हा सुरुवातीपासूनच प्लेऑफमध्ये पोहोचणाऱ्या संघांपैकी एक मानला जात होता, मात्र गेल्या काही सामन्यांमध्ये संघाची हालत खराब झाली.

आरसीबीला गेल्या चारपैकी तीन सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. आयपीएल 2023 च्या 54 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने 199 धावा केल्या.

200 धावांचा पाठलाग करताना इशान किशनने 21 चेंडूत 42 धावांची खेळी केली. सूर्यकुमार यादवने 35 चेंडूत 83 धावा आणि नेहल वढेराने 34 चेंडूत 52 धावा केल्याने मुंबई इंडियन्सचा 6 गडी राखून विजय झाला. या दणदणीत विजयासह मुंबई इंडियन्स आता गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे.

मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या खात्यात 10 गुण होते. आरसीबीने त्यांचे उर्वरित सर्व सामने जिंकले असते तर त्यांचे 18 गुण झाले असते. मात्र, आता हे शक्य नाही. पण रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू अजूनही जास्तीत जास्त 16 गुण मिळवू शकतो.

मात्र त्यासाठी आरसीबीला त्यांचे उर्वरित तीनही सामने जिंकावे लागतील. आयपीएल 2023 च्या गुणतालिकेत गुजरात टायटन्स सध्या 16 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. गुजरातला प्लेऑफमध्ये आपले स्थान पक्के करण्यासाठी उर्वरित तीन सामन्यांतून आणखी एका विजयाची गरज आहे.

चेन्नई सुपर किंग्सने आतापर्यंत 11 सामने खेळले असून त्यांचे 13 गुण आहेत. जर सीएसकेने त्यांचे उर्वरित तीन सामने जिंकले तर त्यांचे 17 गुण होतील, जे त्यांना पहिल्या चारमध्ये नेण्यासाठी पुरेसे आहेत.

राजस्थान रॉयल्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्जचे देखील 10 गुण आहेत परंतु त्यांनी 11 सामने खेळले आहेत त्यामुळे ते जास्तीत जास्त 16 गुणांपर्यंत पोहोचू शकतात.

आयपीएल 2023 च्या प्लेऑफमध्ये चौथ्या स्थानासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, कोलकाता नाइट रायडर्स, राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात स्पर्धा आहे. जो संघ त्यांच्या उर्वरित सामने जिंकेल तो आयपीएल 2023 च्या प्लेऑफसाठी पात्र ठरेल.

तथापि, प्लेऑफमध्ये पोहोचण्याचे जवळपास स्पष्ट समीकरण या आठवड्याच्या अखेरीस येईल. सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स देखील या दरम्यान काही आश्चर्य करू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT