MS Dhoni  
IPL

RR vs CSK :"हे माझ्या हृदयाच्या खूप....'' पराभवानंतर MS Dhoni भावुक, VIDEO

राजस्थान रॉयल्सकडून चेन्नई सुपर किंग्जचा सलग दुसरा पराभव

धनश्री ओतारी

राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात झालेल्या सामन्यामध्ये सीएसके संघाचा 32 धावांनी पराभव झाल. या पराभवानंतर सीएसकेचा कॅप्टन महेंद्र सिंह धोनी भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यांने जयपुरमध्ये खेळल्या गेलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या आठवणींना उजाळा दिला. ( IPL 2023 Sawai Mansingh Stadium venue is close to my heart MS Dhoni recalls losing RR )

राजस्थानने ठेवलेल्या 203 धावांचा पाठलाग करताना चेन्नईकडून ऋतुराज गायकवाड (47) आणि शिवम दुंबे (33 चेंडूत 52 धावा) यांनी झुंजार फलंदाजी केली. मात्र सीएसकेला 20 षटकात 170 धावांपर्यंतच मजल मारता आली. हा सामना सवाई मानसिंह स्टेडिअमवर खेळवण्यात आला होता. त्यानंतर धोनीने माध्यमांशी संवाद साधला.

काय म्हणाला धोनी?

जयपूरमधील आठवणींना उजाळा देत कर्णधार धोनी म्हणाला, "मला वाटते की माझे पहिले एकदिवसीय शतक करण्यासाठी मला 10 सामने लागले, पण याच खेळपट्टीवर मी श्रीलंकेविरुद्ध 183 धावा केल्या. याच मैदानावरुन माझ्या करिअरला नवं वळणं लागलं. त्यामुळे हे मैदान. माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहे. अस सांगत तो भावुक झाला.

यासोबतच, यशस्वीच्या फलंदाजीचे कौतुक केले. "यशस्वीने खरोखरच चांगली फलंदाजी केली, गोलंदाजांचा पाठलाग करणे, जोखीम पत्करणे महत्त्वाचे होते. आमच्या गोलंदाजांविरुद्ध हे थोडे सोपे होते. कारण आम्हाला योग्य लेंथचा निर्णय घ्यायचा होता. " तरीही यशस्वीने चांगली फलंदाजी केली. असं धोनी म्हणाला.

राजस्थान रॉयल्सने पॉईंट टेबलचे टॉपर असलेल्या चेन्नई सुपर किंग्जविरूद्ध 202 धावांचा डोंगर उभा केला. सलामीवीर यशस्वी जैसवालने 43 चेंडूत 77 धावांची धडाकेबाज खेळी केली.

विशेष म्हणजे सवाई मानसिंग स्टेडियमवर कोणालाही 200 धावाचा टप्पा पार करता आला नव्हता तो राजस्थानने संजू सॅमसनच्या 200 व्या सामन्यात पार केला. राजस्थानने 32 धावांनी सामना जिंकत 10 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : पुण्यात महात्मा गांधीजींच्या पुतळ्याचे शिर उडवण्याचा प्रयत्न; एकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

Lottery Scam : लॉटरीच्या नावाखाली दाम्पत्याने 600 लोकांना 40 कोटींचा घातला गंडा; लोकांनी 5 ते 10 लाखांपर्यंत केली होती गुंतवणूक

Maharashtra Rain Update News : राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस, पुढील पाच दिवस महत्वाचे; ११ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

IT Park:'जमीन पसंत पडेना, आयटी पार्क होईना'; प्रशासनाचा कागदी खेळ, कृषि महाविद्यालयला पर्यायी प्रस्ताव मान्य नाही

Indian Railways: मिनिटाला निघणार दीड लाख तिकिटे; रेल्वे प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय,आरक्षण केंद्रातील यंत्रणेत बदल

SCROLL FOR NEXT