IPL 2023 
IPL

IPL 2023: किंग खानसह मुंबईच्या टीमला मोठा धक्का; खेळाडूंनी केले नियमांचे उल्लंघन, पुढील सामन्यात...

मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामन्यानंतर खेळाडूंवर मोठी कारवाई

धनश्री ओतारी

आयपीएलच्या सोळाव्या सीझनमध्ये काल म्हणजेच रविवारी मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स असा सामना रंगला. सामन्यात केकेआरने विजयासाठी ठेवलेले 186 धावांचे आव्हान 6 फलंदाज आणि 17.4 षटकात पार करत सहज विजय मिळवला. दरम्यान, केकेआरला पराभवासह आणखी एक धक्का सहन करावा लागला आहे. संघाच्या खेळाडूंनी नियमांचे उल्लंघन केले आहे. यामध्ये मुंबईचा खेळाडूदेखील सहभागी आहे. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली असून आगामी सामन्या तिघांना खेळवण्यात येणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. (IPL 2023 Suryakumar Yadav Nitish Rana Hrithik Shokeen fined in heated MI vs KKR clash at Wankhede )

शिक्षा सुनावण्यात आलेल्या तीन खेळाडूंमध्ये या सामन्यातील मुंबई इंडियन्सचा कर्णधार सूर्यकुमार यादव, केकेआरचा कर्णधार नितीश राणा आणि मुंबई इंडियन्सचा गोलंदाज हृतिक शॉकीन यांचा समावेश आहे. प्रत्येक खेळाडूला वेगवेगळी शिक्षा मिळाली असून मॅच रेफरीसमोर आपली चूक मान्य केल्यानंतर त्यांना शिक्षा देण्यात आली आहे.

सुर्यकुमार यादवला १२ लाखाचा दंड

या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार असलेला सूर्यकुमार यादव स्लो ओव्हर रेटसाठी दोषी आढळला आहे. आणि या बदल्यात त्याला 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

सूर्यकुमार यादव हा आयपीएल 2023 मधला चौथा कर्णधार आहे ज्याला स्लो ओव्हर रेटमुळे 12 लाखांचे नुकसान झाले आहे. त्याच्याआधी फाफ डु प्लेसिस, संजू सॅमसन आणि हार्दिक पांड्यालाही दंड ठोठावण्यात आला आहे.

नितीश राणाच्या मॅच फीमध्ये २५ टक्के कपात

केकेआरचा कर्णधार नितीश राणाला सामन्यादरम्यान मैदानावर अपशब्द वापरल्याबद्दल शिक्षा झाली आहे. मॅच रेफरीने त्याला आयपीएल आचार संहितेच्या कलम 2.21 अंतर्गत लेव्हल 1 च्या गुन्ह्यासाठी दोषी ठरवले आहे. त्याच्या मॅच फीमध्ये 25 टक्के कपात करण्यात आली आहे.

हृतिक शॉकीनला मोठा दंड

नितीश राणाशिवाय मुंबई इंडियन्सचा गोलंदाज हृतिक शोकीनलाही नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंड ठोठावण्यात आला आहे. त्याच्या मॅच फीमध्ये 10 टक्के कपात करण्यात आली आहे. त्याला आयपीएलच्या आचारसंहितेच्या कलम 2.5 अंतर्गत लेव्हल 1 साठी दोषी ठरवण्यात आले आहे.

विशेष म्हणजे या खेळाडूंना सामना खेळण्यास बंदी घालण्यात आलेली नाही. त्यांना केवळ दंड ठोठवण्यात आला आहे. त्यामुळे हे तिघेही पुढील सामन्यात त्यांच्या संघासाठी उपलब्ध असतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission च्या नावाखाली मोठी फसवणूक; चुकूनही डाउनलोड करू नका 'हे' नवीन अ‍ॅप, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी धोक्याची घंटा

Ujjain Temple: उज्जैनमध्ये आज 'चमत्कार'! पहाटे होणारी भस्म आरती आज दुपारी; वर्षातून फक्त एकदाच मिळते अशी संधी, पाहा काय आहे कारण

टिपू सुलतानचा फोटो पुन्हा लावणार, गैर काय? उपमहापौरांनी स्पष्ट केली भूमिका

लाइफ बना दूँगा! रिलस्टार बनवण्याचं आमिष, १५ वर्षीय मुलीवर युट्यूबरचा लेकासह अत्याचार; दोघांना अटक

Latest Marathi News Update : नाशिकच्या दरी मातोरी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार

SCROLL FOR NEXT