IPL 2023,Ganguly kohli sakal
IPL

IPL 2023 : दादा आणि किंग मधलं भांडण मिटलं? गांगुली कोहलीने फायनली केला हँडशेक

याआधी घडलेल्या घटनांना दोघांनाही मागे टाकल्याचे देहबोलीवरून दिसून येत होते. दरम्यान, गांगुली बीसीसीआयचे अध्यक्ष असताना विराट याला भारतीय संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्यास दबाव टाकत होते, अशी चर्चा होती.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुली व सध्याचा स्टार फलंदाज विराट कोहली यांच्यामधील संबंध सलोख्याचे नाहीत. दोघांमध्ये वितुष्टता आहे. अशी चर्चा रंगू लागली असतानाच दिल्ली कॅपिटल्स - रॉयल चॅलेंजर्स बंगळूर यांच्यामध्ये शनिवारी झालेली आयपीएल लढत पार पडल्यानंतर दोघांनी हस्तांदोलन केले.

काही वेळ चर्चाही केली. याआधी घडलेल्या घटनांना दोघांनाही मागे टाकल्याचे देहबोलीवरून दिसून येत होते. दरम्यान, गांगुली बीसीसीआयचे अध्यक्ष असताना विराट याला भारतीय संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्यास दबाव टाकत होते, अशी चर्चा होती.

कोहली यानेही पत्रकार परिषदेत याबाबत स्पष्ट मत व्यक्त केले होते. या घटनेमुळे दोघांमध्ये वाद असल्याचे समोर आले होते. तसेच दिल्ली कॅपिटल्स - रॉयल चॅलेंजर्स बंगळूर यांच्यामधील यंदाच्या आयपीएल मोसमातील पहिल्या फेरीच्या लढतीनंतर दोघांनीही एकमेकांना हात मिळवले नव्हते. त्यामुळे आणखीनच चर्चेला उधाण आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टात घमासान! सिब्बल यांच्याकडून निवडणूक आयोगाची पोलखोल; दिला थेट पुरावा; म्हणाले ''आयोग खोटं बोलतोय''

Pan Masala New Rules: पान मसाला खाणाऱ्यांसाठी मोठी बातमी! FSSAI चा कंपन्यांना दणका, नवे नियम लागू, जाणून घ्या काय बदललं?

Gold Price: सोन्यात १० हजारांची, तर चांदीत २० हजारांची उसळी; सुवर्ण बाजाराची तेजीकडे वाटचाल

Marathi News Live Updates : सुप्रीम कोर्टात सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद, निवडणूक आयोगाला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न, नेमकं काय घडतंय?

Imran Khan Death Claim : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा तुरुंगात मृत्यू ? पत्रकाराच्या दाव्याने खळबळ

SCROLL FOR NEXT