IPL 2023 
IPL

IPL 2023: केवळ ८ शब्द अन्...विराटने केली कविता, Video Viral

स्टार फलंदाज विराट कोहली सध्या जबरदस्त फॉर्मात दिसून येत आहे.

धनश्री ओतारी

देशभरात आयपीएलचा फीव्हर पाहायला मिळत आहे. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा स्टार फलंदाज विराट कोहली सध्या जबरदस्त फॉर्मात दिसून येत आहे. दरम्यान, त्याचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये तो चक्क कविता लिहताना दिसत आहे.

रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने विराट कोहलीचा मुलाखतीदरम्यानचा एक व्हिडिओ ट्विट केला आहे. विराटने स्वरचित कविता ऐकवून दाखवली आहे. ही कविता अत्यंत प्रेरणादायी असून केवळ 8 शब्दांचा वापर करून विराटने ही कविता लिहिली आहे.

सध्या विराटचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून विराटाचे चाहते त्यावर लाईक्सचा वर्षाव करीत आहेत.

आयपीएल 2023 च्या निमित्ताने मिस्टर नॅग्स याने विराट कोहलीची मुलाखत घेतली. या मुलाखतीत विराटला मिस्टर नॅग्सने पोएट्री चॅलेंज म्हणजेच कविता करण्याचे चॅलेंज दिले होते.

ज्यामध्ये त्याने विराटला फक्त आठ शब्द दिले आणि कविता लिहिण्यास सांगितले. नॅग्सने विराटला फायर, बॅट, पिकल, टाइड, डकस मॅन आणि 49 हे शब्द दिले होते.

"तुमच्या इच्छा पूर्ण करा, तुमच्यातील आग प्रज्वलित करा, कठीण काळात फलंदाजी करा, यामध्ये कधी 263 होतील तर कधी 49 . आयुष्यात अनेक कठीण प्रसंग येतील पण या परिस्थितीतही तुम्ही आनंदी राहायला आणि हसायला विसरू नका.

तुम्हचे शतक होवो अथवा डक आउट आयुष्य हे पुढे चालूच राहते तुम्ही थांबू नका, तुम्हीच आहात तुमच्या जीवनाचे शिल्पकार." अशी कविता विराटने केवळ ८ शब्दांवर रचली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT