Virat Kohli
Virat Kohli 
IPL

Virat Kohli : 'पुढच्या हंगामात नक्की...' RCB प्लेऑफमधून बाहेर पडल्यानंतर विराट कोहलीचे पहिले पोस्ट

Kiran Mahanavar

IPL 2023 Virat Kohli : आयपीएलच्या या हंगामातील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा प्रवास संपल्यानंतर विराट कोहलीने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. गुजरात टायटन्सविरुद्धचा शेवटचा साखळी सामना आरसीबीने जिंकला असता तर मुंबई इंडियन्सऐवजी प्लेऑफमध्ये पोहोचले असते. विराट कोहलीने शतक झळकावले होते, पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. गुजरात टायटन्सकडून 6 गडी राखून पराभव झाला.

या मोसमातील संघाच्या कामगिरीने पुन्हा एकदा आरसीबी संघाच्या समर्थकांना निराश व्हावे लागले. प्ले ऑफमधून बाहेर पडल्यानंतर विराट कोहलीचे पहिले ट्विट समोर आले आहे. आरसीबी संघाच्या समर्थकांचे आभार मानत कोहलीने आपल्या पोस्टमध्ये पुढील हंगामात जोरदार पुनरागमन करण्याबाबत लिहिले आहे.

विराट कोहलीने 23 मे रोजी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, या हंगामात असे काही क्षण होते जे कधीच विसरता येणार नाहीत, परंतु आम्ही आमच्या ध्येयापूर्वी थोडेसे चुकलो. नक्कीच निराश झालो परंतु आपली मान मान उंचावली पाहिजे. संघाच्या निष्ठावंत समर्थकांचा मी ऋणी आहे. मी माझा संघ, प्रशिक्षक, व्यवस्थापन आणि सहकारी खेळाडूंचे आभार मानू इच्छितो. पुढच्या हंगामात आणखी मजबूत परत येण्याचे आमचे ध्येय आहे.

आयपीएलचा हा हंगाम फलंदाज म्हणून विराट कोहलीसाठी चांगलाच राहिला. गुजरातविरुद्धच्या सामन्यात त्याच्या बॅटतुन शतकीय खेळीही पाहायला मिळाली. मात्र शुभमन गिलच्या शतकामुळे या सामन्यात आरसीबीला पराभवाचा सामना करावा लागला. आरसीबीच्या पराभवासह मुंबई इंडियन्स प्लेऑफसाठी पात्र ठरण्यात यशस्वी ठरली.

कोहलीने या हंगामात 14 डावात एकूण 639 धावा केल्या. जिथे त्याच्या बॅटमधून सलग 2 शतकी खेळी पाहायला मिळाली. यासोबतच त्याने 6 अर्धशतकेही झळकावली. आयपीएलमध्ये सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत विराट कोहली आता पहिल्या क्रमांकावर आला असून त्याच्या नावावर आता एकूण 7 शतकांची नोंद झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ghatkopar Hoarding: घाटकोपर दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत, दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Latest Marathi News Live Update : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत आतापर्यंत ८ लोकांचा मृत्यू

Maharashtra Lok Sabha Election 2024 : चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रात 52.63 टक्के मतदान, शिरुर अन् पुण्यात मतदारांचा कमी प्रतिसाद

KL Rahul : हे तर पेल्यातलं वादळ... केएल अन् गोयंका वादावर लखनौच्या कोचला नेमकं काय म्हणायचंय?

Ghatkopar Hoarding Collapse: घाटकोपर होर्डिंग कोसळल्याने आतापर्यंत 3 जणांना मृत्यू; जाणून घ्या नेमकं काय घडलं!

SCROLL FOR NEXT