IPL 2023  sakal
IPL

IPL 2023 : 'या' 3 स्टार खेळाडूंनी जिंकली लॉटरी! मॅच न खेळता झाले करोडपती

बेंचवर बसून हे खेळाडू झाले करोडपती

Kiran Mahanavar

चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्सचा 5 विकेट्सने पराभव करून आयपीएल २०२३चे विजेतेपद पटकावले. पण आयपीएल 2023 मध्ये असे तीन खेळाडू आहेत ज्यांना एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. हे खेळाडू संपूर्ण हंगाम बेंचवर बसले. मात्र बेंचवर बसून हे खेळाडू करोडपती झाले आहेत. जाणून घेऊया या खेळाडूंबद्दल.

Matthew Wade IPL 2023

ऑस्ट्रेलियन यष्टिरक्षक फलंदाज मॅथ्यू वेडला गुजरात टायटन्सने 2.40 कोटी रुपयांना खरेदी केले. त्याने आयपीएल 2022 मध्ये संघासाठी 10 सामन्यात 157 धावा केल्या. पण त्याला आयपीएल 2023 मध्ये एकही सामना खेळण्याची संधी मिळू शकली नाही. या कारणास्तव तो संपूर्ण हंगाम बेंचवर बसला. गुजरात टायटन्सने आयपीएल 2023 च्या फायनलमध्ये प्रवेश केला. जिथे त्यांना CSK कडून पराभवाचा सामना करावा लागला.

आयपीएल 2023 मध्ये मुंबई इंडियन्सने प्लेऑफपर्यंतचा प्रवास केला. दक्षिण आफ्रिकेचा युवा फलंदाज डेवाल्ड ब्रेविसला मुंबई इंडियन्सने तीन कोटी रुपयांना खरेदी केले. पण कर्णधार रोहित शर्माने ब्रेविसला आयपीएल 2023 मध्ये एकाही सामन्यात संधी दिली नाही. तो पूर्ण वेळ बाकावर बसला होता. त्याने मुंबईसाठी आयपीएल 2022 च्या 7 सामन्यात 161 धावा केल्या होत्या.

भारतीय कसोटी संघाचा युवा यष्टीरक्षक फलंदाज केएस भरतला गुजरातने 1 कोटी 20 लाख रुपयांना खरेदी केले. पण भरतला आयपीएल 2023 च्या एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळू शकली नाही. गुजरात संघात आधीच उपस्थित असलेल्या ऋद्धिमान साहाने यष्टिरक्षणाची जबाबदारी स्वीकारली. तर भरत हा भारतीय कसोटी संघाचा महत्त्वाचा भाग आहे. त्याने आतापर्यंत आयपीएलच्या 10 सामन्यांत 199 धावा केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

City Disfigurement Award : ‘शहर विद्रूपीकरण पुरस्कार’ भाजप नगरसेवकांना; स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंना प्रथम, सुतारांना द्वितीय, तर पांडेंना तृतीय

Pune Shivajinagar Court Firing Health Update : "पुढचे ७२ तास अत्यंत महत्त्वाचे!" शिवाजीनगर कोर्टाबाहेर हल्ला झालेल्या मंदार किवळेची प्रकृती चिंताजनक; ससूनच्या अधिष्ठात्यांकडून महत्त्वाची माहिती

Online Gaming: PUBG मधून जुळली मैत्री; मग प्रेमाचे नाटक! गेमिंग पार्टनरनेच तरुणीचा गळा आवळला

26/11 Mumbai Attack 18th Anniversary : लाठी घेऊन कसाबच्या गोळ्या अंगावर झेलणारे तुकाराम ओंबळे अन् 'ती' ६० तासांची काळी रात्र! १८ वर्षांनंतरही मुंबईच्या जखमा ताज्या; तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणानंतर कुठवर पोहोचला न्याय?

Meta Congress Meeting Controversy : 'मेटा भाजप का बेटा', मेटा-काँग्रेस बैठकीत जोरदार खडाजंगी! राहुल गांधींच्या पोस्टवर निर्बंध येत असल्याचा काँग्रेसचा आरोप; भारतीय कायद्यांचे पालन करत असल्याचे मेटाचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT