IPL 2023 Awards List sakal
IPL

IPL 2023 Awards List: जैस्वाल इमर्जिंग प्लेयर तर गिलने जिंकले हे विजेतेपद! जाणून घ्या कोणता पुरस्कार कोणाला

Kiran Mahanavar

IPL 2023 Awards List : आयपीएल 2023 च्या अंतिम सामन्यात सीएसकेने गुजरातचा 5 गडी राखून पराभव करून पाचव्यांदा चॅम्पियन बनले. हा सामना संपल्यानंतर आयपीएलच्या या मोसमात चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा गौरव करण्यात आला.

राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर युवा फलंदाज यशस्वी जैस्वालला इमर्जिंग प्लेयर ऑफ द सीझनचा पुरस्कार देण्यात आला. यशस्वी जैस्वालने या मोसमात आपल्या संघासाठी 14 सामन्यांत 625 धावा केल्या आहेत.

आयपीएल 2023 मध्ये गुजरातचा सलामीवीर फलंदाज शुभमन गिलने धडाकेबाज फलंदाजी करत 17 सामन्यांमध्ये सर्वाधिक 890 धावा केल्या. तो या मोसमाचा ऑरेंज कॅप विजेता तसेच त्याला मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयरचा किताबही देण्यात आला होता.

गिलने हे विजेतेपद पटकावल्यानंतर सांगितले की, माझ्यासाठी याचा खूप अर्थ आहे आणि माझी मेहनत योग्य दिशेने जात आहे. आम्ही अंतिम सामना जिंकलो नाही, पण चांगली सुरुवात करणे महत्त्वाचे होते आणि मी ते केले. यावेळी मी 40-50 स्कोअरचे मोठ्या स्कोअरमध्ये रूपांतर करू शकलो.

मोहम्मद शमीने या मोसमात सर्वाधिक 28 विकेट घेतल्या आणि त्याला पर्पल कॅपचा किताब मिळाला. रशीद खानला कॅच ऑफ द सीझनचा किताब मिळाला. त्याने लखनौविरुद्ध काईल मायर्सचा सर्वोत्तम झेल पकडला. दिल्ली कॅपिटल्सला फेअर प्ले अवॉर्ड देण्यात आला आहे.

जाणून घ्या कोणत्या खेळाडूला मिळाले कोणते विजेतेपद

  • डेव्हॉन कॉनवे - सामनावीर (अंतिम सामन्यासाठी)

  • यशस्वी जैस्वाल - इमर्जिंग प्लेयर ऑफ द सीजन

  • शुभमन गिल - मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर ऑफ द सीजन

  • शुभमन गिल - ऑरेंज कॅप (890 धावा)

  • मोहम्मद शमी - पर्पल कॅप (28 विकेट)

  • राशिद खान - कॅच ऑफ द सीझन

  • दिल्ली कॅपिटल्स - फेअर प्ले अवॉर्ड

  • CSK - विजेता

  • गुजरात टायटन्स - उपविजेता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Sugarcane Price Protest : सांगली जिल्ह्यात ऊसदराचे आंदोलन पेटले, आमदार अतुल भोसलेंच्या कारखाना राजू शेट्टींच्या सहकाऱ्यांनी पाडला बंद, आंदोलन चिघळण्याची शक्यता

India A vs Australia A, ODI: भारतीय संघाने व्हाईटवॉश टाळला! ऑस्ट्रेलियाला शेवटच्या सामन्यात पराभवाची धूळ चारली

Supreme Court March : राहुल गांधींनी व्हिडिओ शेअर करत दिली देशवासियांना 'चलो दिल्ली'ची हाक; सरन्यायाधीशांकडे दाद मागणार

Mumbai Protest: मुंबईत वातावरण तापलं, ठाकरे कुटुंब पोलीस स्थानकात; व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

SCROLL FOR NEXT