IPL 2024 15 Day Schedule Announce esakal
IPL

IPL 2024 15 Day Schedule : आयपीएलचे 15 दिवसांचेच शेड्युल; लोकसभा निवडणुकीमुळं अर्धा हंगाम होणार परदेशात?

IPL 2024 Schedule : लोकसभा निवडणुकीमुळे आयपीएलचा अर्ध्याच हंगामाचं वेळापत्रक?

अनिरुद्ध संकपाळ

IPL 2024 15 Day Schedule Announce : इंडियन प्रीमियर लीग 2024 ची सुरूवात ही 22 मार्च पासून सुरू होणार आहे. याबाबची घोषणा नुकतीच आयपीएल चेअरमन अरूण सिंह धुमल यांनी केली आहे. आज आयपीएलचे वेळापत्रक जाहीर होणार आहे. मात्र हे वेळापत्रक फक्त 15 दिवसांचेच असण्याची शक्यता आहे.

आयपीएल चेअरमन धुमल यांनी लोकसभेच्या निवडणूकीची तारीख जाहीर झाल्यानंतरच आयपीएलचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर होणार असल्याचं सांगितले होतं. यंदाच्या 17 व्या हंगामाचा पहिला सामना हा चेन्नईत खेळला जाण्याची शक्यता आहे.

आयपीएलच्या 2024 च्या हंगामाचे वैशिष्ट म्हणजे लीग सुरू होण्यापूर्वी एक खास ग्रँड ओपनिंग सेरेमनी आयोजित केला जाणार आहे. मात्र पहिला सामना हा गेल्या हंगामातील फायनलिस्ट चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्याने होणार की नाही हे अजून निश्चित नाही.

यावर्षी एप्रिल - मे महिन्यात भारतात लोकसभा निवडणूक होत आहे. यादरम्यानच आयपीएलचे देखील सामने होणार असून दोन्हीचे शेड्युल हे क्लॅश होण्याची शक्यता आहे. निवडणूक आणि आयपीएल या दोन्हीला एकाचवेळी सुरक्षा देणे शक्य होत नाही.

त्यामुळे बीसीसीआय निवडणूक आयोग लोकसभेच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्याची वाट पाहत आहे. त्यानंतरच आयपीएलचे पूर्ण शेड्युल देखील जाहीर करण्यात येईल.

बीसीसीआयला आयपीएलमधून मोठा महसूल मिळत असतो. जर आयपीएलचा हंगाम पदेशात झाला तर हा महसूल मिळण्याची शक्यता कमी होते. यापूर्वी 2009 ला निवडणुकांमुळे आयपीएलचं आयोजन दक्षिण आफ्रिकेत करण्यात आले होते. याचबरोबर 2014 मध्ये देखील अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी आयपीएलचे काही सामने युएईमध्ये शिफ्ट करण्यात आले होते. तर 2019 मध्ये निवडणुका होत असताना देखील पूर्ण लीग भारतातच खेळवण्यात आली होती. यावेळी देखील असच करण्याचा मानस बीसीसीआयचा आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs ENG SF: नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने! सूर्याने सांगितला आम्हाला हवं तेच झालं; Playing XI मध्ये बघा काय बदल झाला

Petrol Diesel Shortage: पेट्रोल, डिझेलची खरंच टंचाई आहे का? केंद्र सरकारकडून आलं स्पष्टीकरण

ललित प्रभाकर–विदुला चौघुलेच्या स्टायलिश लुकची चर्चा! ‘सुट्टा रोल’ पार्टी ट्रॅक प्रेक्षकांच्या भेटीला

Akhil Bharatiya Natya Parishad : घटनेला हरताळ फासून पदे वाटली? नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेचा कारभार वादाच्या भोवऱ्यात

Bihar CM: बिहारच्या राजकारणात मोठी उलथापालथ! 'या' ३ कारणांमुळे नितीश कुमार CM पदावरून हटणार; नवं सरकार कधी स्थापन होणार?

SCROLL FOR NEXT