IPL 2024 Auction Players List esakal
IPL

IPL 2024 Auction List : 333 खेळाडू अन् 77 स्लॉट! लिलावात सहभागी होणाऱ्या खेळाडूंची यादी जाहीर

अनिरुद्ध संकपाळ

IPL 2024 Auction Players List : इंडियन प्रीमियर लीग 2024 चा लिलाव 19 डिसेंबरला दुबईत होणार आहे. यासाठी लिलावात सहभागी होणाऱ्या खेळाडूंची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. यंदाचा लिलाव हा इतिहासातील पहिला विदेशात होणार लिलाव ठरणार आहे. भारतीय वेळीनुसार दुपारी 2.30 मिनिटांनी हा लिलाव सुरू होईल.

इंडियन प्रीमियर लीगने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून दिलेल्या माहितीनुसार एकूण 333 खेळाडूंचा लिलाव होणार आहे. यात 214 भारतीय तर 119 विदेशी खेळाडू आहेत. सर्व संघांचे मिळून फक्त 77 स्लॉट शिल्लक आहेत. यातील 30 स्लॉट हे विदेशी खेळाडूंसाठी आहे.

यंदाच्या लिलावात गुजरात टायटन्सच्या पर्समध्ये सर्वाधिक पैसे असणार आहेत. त्यांच्याकडे सध्या 38.15 कोटी रूपये शिल्लक आहेत. तर सर्वाधिक स्लॉट हे कोलकाता नाईट रायडर्सला भरायचे आहेत.

यंदाच्या आयपीएल लिलावात नुकत्याच झालेल्या वनडे वर्ल्डकपचा प्रभाव नक्की असणार आहे. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला होता. त्यामुळे यंदाच्या लिलावात ऑस्ट्रेलियन खेळाडूंची चलती असण्याची शक्यता आहे. यात मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स आणि ट्रॅविस हेड सारख्या खेळाडूंवर किती बोली लागते हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

यंदाच्या लिलावात एकूण 23 खेळाडूंनी आपली बेस प्राईस ही 2 कोटी इतकी ठेवली आहे. इंग्लंडचा हॅरी ब्रूक, ख्रिस वोक्स, बेन डकेट यांनी सुमार कामगिरीनंतरही आपली बेस प्राईस 2 कोटी रूपये ठेवली आहे.

दुसरीकडे वनडे वर्ल्डकपमध्ये धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या न्यूझीलंडच्या रचिन रविंद्र आणि अफगाणिस्तानच्या अजमतुल्लाह उमरजाई यांनी आपली बेस प्राईस 50 लाख ठेवली. मात्र या दोघांवर अनेक फ्रेंचायजी बोली लावतील अशी आशा आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bapu Pathare: १०० लोक जमा केले अन्...; बापू पठारेंना मारहाण का झाली? पत्रकार परिषदेत आमदारांनी संपूर्ण विषयच उलगडून सांगितला!

दिवाळीत Invitation Cards बनवायचयं? तर Google Geminiचे 'हे' प्रॉम्प्ट वापरा

World Cup 2025: भारताने जिंकलेला टॉस? पण पाकिस्तानी कर्णधार राहिली चूप; IND vs PAK सामन्यापूर्वीच वादग्रस्त घटना; Video

Solapur Crime:'पैशांवरून पत्नीचा खून; पतीस जन्मठेप'; गॅस टाकीसाठी ठेवलेले पैसे पतीने दारुत उडवले, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update: सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांचा ट्रॅक्टरमधून प्रवास

SCROLL FOR NEXT