IPL 2024 Auction esakal
IPL

IPL 2024 Auction : तारीख ठरली! बीसीसीआयने आयपीएल 2024 च्या लिलावासंदर्भात दिली मोठी अपडेट

अनिरुद्ध संकपाळ

IPL 2024 Auction : भारतात सध्या वनडे वर्ल्डकपचा फिव्हर जोर धरू लागला आहे. यादरम्यान, बीसीसीआयने अजून एक मोठी घोषणा करत भारतातील क्रिकेट चाहत्यांचे लक्ष आयपीएल 2024 कडे देखील वेधले.

बीसीसीआयने फ्रेंचायजींना त्यांचे रिलीज आणि रिटेन खेळाडू कोण कोण असतील याची यादी 15 नोव्हेंबर पर्यंत जमा करण्यास सांगितले आहे. आयपीएल 2024 साठी ट्रेडिंग विंडो ओपन आहे. मात्र वर्ल्डकप सुरू असल्याने तेथे फार हालचाली होताना दिसत नाहीये.

आयपीएल 2024 लिलाव हा एका दिवसात संपणार आहे. विशेष म्हणजे पहिल्यांदाच आयपीएलचा लिलाव हा विदेशात देखील होण्याची शक्यता आहे. हा लिलाव 19 डिसेंबरला दुबईत होण्याची शक्यता आहे. आयपीएलचा मेगा लिलाव हा 2024 ला डिसेंबर महिन्यात होणार आहे.

यंदाचा लिलाव जरी मिनी लिलाव असला तरी खेळाडूंना किती पैसे मिळतील याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. संघांची पर्स आता वाढवली आहे. प्रत्येक संघाच्या पर्समध्ये 5 कोटी रूपयांची वाढ होऊन ती 100 कोटी झाली आहे.

कोणाच्या पर्समध्ये किती रक्कम शिल्लक?

  • पंजाब किंग्ज - 12.20 कोटी रूपये

  • मुंबई इंडियन्स - 50 लाख रूपये

  • सनराईजर्स हैदराबाद - 6.55 कोटी रूपये

  • गुजरात टायटन्स - 4.45 कोटी रूपये

  • दिल्ली कॅपिटल्स - 4.45 कोटी रूपये

  • लखनौ सुपर जायंट्स - 3.55 कोटी रूपये

  • राजस्थान रॉयल्स - 3.35 कोटी रूपये

  • रॉयल चॅलेंजर बेंगलोर - 1.75 कोटी रूपये

  • कोलकाता नाईट राडयर्स - 1.65 कोटी रूपये

  • चेन्नई सुपर किंग्ज - 1.5 कोटी रूपये

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT