IPL 2024  ESAKAL
IPL

IPL 2024 : कुठंच काही जुळत नाही... पांड्याचं GT सोडून जाणं अन् गिलचं कर्णधार होणं; चोप्रा-भोगलेंना नेमकं काय खटकलं?

अनिरुद्ध संकपाळ

IPL 2024 Hardik Pandya Shubman Gill : गुजरात टायटन्सचा टायटल विजेता कर्णधार हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्समध्ये परतणार की नाही याचा खेळ काल रात्रपर्यंत सुरू होता. अखेर यावर आज दुपारी अधिकृतरित्या पडदा पडला. हार्दिकसाठी मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्समध्ये 'व्यवहार' झाला असून आता पांड्या पुन्हा एमआयची जर्सी घालण्यास सज्ज झाला आहे.

हार्दिकने गुजरातला राम राम ठोकल्यानंतर गुजरातचे नेतृत्व कोण करणार याची चर्चा सुरू होती. मात्र अवघ्या काही तासात गुजरातने देखील शुभमन गिल आमचा नवा कर्णधार म्हणून घोषणा केली.

या सर्व घडामोडी आणि गोंधळ इतक्या वेगाने सुरू होता की कोणाला काहीच समजत नव्हतं. मात्र या ट्रेड ऑफनंतर काही प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यावर समालोचक आकाश चोप्रा आणि हर्षा भोगले यांनी बोट ठेवलं आहे.

आकाश चोप्रा आपल्या युट्यूब चॅनलवर बोलताना म्हणाला की, 'हार्दिक पांड्याच्या सीव्हीमध्ये एका गोष्ट चांगली दिसत नाही. त्याने कर्णधार होण्यासाठी मुंबई इंडियन्स सोडली होती. तुम्ही गुजरात टायटन्सकडे गेला आणि तुम्ही आता भारतीय संघाचा देखील कर्णधार झाला आहात.'

'आता तुम्ही फ्रेंचायजी कर्णधार राहिलेला नाही. मात्र तरी देखील तुम्हाला भारताचं कर्णधारपद हवं आहे. या गोष्टी कुठंच जुळत नाहीयेत.'

आकाश चोप्रा पुढे म्हणाला की, 'तुम्ही फ्रेंचाजीचा कर्णधार नाही मात्र टी 20 वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाचा कर्णधार आहात ही गोष्ट कोणत्याही चष्म्यातून किंवा अँगलमधून पाहा चांगल्या दिसत नाही. हे ऐकायलाही चांगलं वाटत नाही मात्र आता हे असंच आहे.'

दुसरीकडे हर्षा भोगले यांनी शुबमन गिलच्या गळ्यात कर्णधारपदाची माळ येण्याचं विश्लेषण केलं.

त्यांनी ट्विट केलं की, 'शुभमन गिलच्या आयुष्यात खूप वेगवान हालचाली होत आहेत. फलंदाज म्हणून त्याला 2023 हे वर्ष खूप फलंदायी गेलं आहे. तो दक्षिण अफ्रिकेत कसोटी मालिका आणि टी 20 वर्ल्डकपमध्ये देखील चांगली कामगिरी करण्यास उत्सुक असेल. तिथे त्याला जागा टिकवण्यासाठी स्पर्धेला सामोरं जावं लागणार आहे.'

'जर त्याने केन विलियमसनच्या नेतृत्वाखाली आयपीएल खेळली असती तर त्याचा त्याला फायदाच झाला असता. त्यानंतर 2025 मध्ये त्याच्या खांद्यावर संघाची धुरा दिली असती तरी चाललं असतं.'

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gorakhpur Mumbai Train Bomb Threat : गोरखपूर-मुंबई पॅसेंजर ट्रेनमध्ये बॉम्बची धमकी; प्रवशांमध्ये खळबळ अन् शोधमोहीम सुरू

Hasan Mushrif and Samarjit Ghatge: “शत्रूचा शत्रू तो आपला मित्र”, हसन मुश्रीफ, समरजित घाटगे यांची एकत्र खुर्ची, कागलचे राजकारण बदलणार!

Sangli Leopard: सांगलीत बिबट्याचा वावर; पायाचे ठसे सापडले पण प्रशासनाची कारवाई कुठे अडकली?

मी अशा व्यक्तीबरोबर राहू शकत नाही... टॉक्सिक रिलेशनशिपबद्दल ऋता दुर्गुळेने मांडलं मत; म्हणते, 'तो कितीही...'

Latest Marathi Breaking News : जहाल माओवादी हिडमासह त्याची पत्नीही ठार

SCROLL FOR NEXT