Hardik Pandya News Marathi sakal
IPL

RR vs MI IPL 2024 : 'प्रत्येकाने आपली भूमिका बजावावी...' पराभवानंतर कर्णधार हार्दिक पांड्या खेळाडूंवर संतापला

IPL 2024 Mumbai Indians Hardik Pandya : इंडियन प्रीमियर लीगच्या सतराव्या हंगामातील 38 व्या सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात रंगला होता.

Kiran Mahanavar

IPL 2024 Mumbai Indians Hardik Pandya : इंडियन प्रीमियर लीगच्या सतराव्या हंगामातील 38 व्या सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात रंगला होता.

या सामन्यात पूर्णपणे संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या राजस्थान रॉयल्सचा दबदबा पाहिला मिळाला, ज्यामध्ये संदीप शर्माने 5 बळी घेतले आणि यशस्वी जैस्वालने शतक ठोकले. मुंबई इंडियन्सचा या आयपीएल मोसमातील 8 सामन्यांनंतरचा हा पाचवा पराभव असून आता प्लेऑफमध्ये पोहोचण्याचा मार्ग त्यांच्यासाठी कठीण झाला आहे. या सामन्यात संघाच्या पराभवाचे मुख्य कारण डावाच्या सुरुवातीलाच विकेट गमावल्याचे हार्दिक पांड्याने सांगितले.

राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यातील पराभवानंतर हार्दिक पांड्या म्हणाला की, आमच्या डावाच्या सुरुवातीला आम्ही 20 धावांवर 3 विकेट गमावल्या होत्या. त्यावेळी आम्ही 180 धावांपर्यंत पोहोचू शकू असे वाटले नव्हते पण तिलक आणि नेहल यांनी चांगली फलंदाजी केली. पण आम्ही आमचा डाव अपेक्षेप्रमाणे संपवू शकलो नाही. ज्यात आम्ही 10 ते 15 धावा कमी केल्या. राजस्थानने या सामन्यात खेळाच्या प्रत्येक विभागात आमचा पूर्णपणे पराभव केला.

आपल्या वक्तव्यात हार्दिक पांड्या पुढे म्हणाला की, या सामन्यात आम्ही केलेल्या चुका सुधारल्या पाहिजेत आणि भविष्यात त्यांची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. पुढे जाणे महत्त्वाचे असून आपल्यातील उणिवा स्वीकारून त्यावर काम करावे लागेल. मी खेळाडूंवर जास्त टीका करण्यावर विश्वास ठेवत नाही, मी त्यांना पूर्ण पाठिंबा देतो जेणेकरून चांगले क्रिकेट खेळता येईल. आपण आपल्या योजनेवर ठाम राहून मूलभूत चुका टाळल्या पाहिजेत.

मुंबई इंडियन्सला 27 एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध त्यांचा पुढील सामना खेळायचा आहे, तर संघ सध्या 6 गुणांसह गुणतालिकेत 7व्या स्थानावर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT