mumbai indians  
IPL

IPL 2024 : मुंबई इंडियन्सने 'या' खेळाडूंना केलं रिटेन; तर अर्चर, जॉर्डनसह ११ जण रिलीज, पाहा यादी

आयपीएल २०२४ चा लिलाव पुढील महिन्यात १९ डिसेंबर रोजी दुबईत होणार आहे

रोहित कणसे

आयपीएल २०२४ चा लिलाव पुढील महिन्यात १९ डिसेंबर रोजी दुबईत होणार आहे. त्याआधी या लीगमध्ये खेळणाऱ्या संघांनी रिटेन आणि रिलीज झालेल्या खेळाडूंची यादी शनिवारी बीसीसीआयकडे सादर केली. पुढील हंगामातील लिलावापूर्वी मुंबई इंडियन्सने देखील बीसीसीआयकडे संघात रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी सादर केली. हार्दिक पांड्याबद्दल असे म्हटले जात होते की तो मुंबई संघात पुनरागमन करेल, परंतु तसे झाले नाही आणि तो गुजरात टायटन्ससोबत राहणार आहे.

मुंबईने जोफ्रा आर्चरला सोडलं

मुंबई संघाने सातत्याने दुखापतीशी झुंज देत असलेला वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला रिलीज केले आहे. जोफ्रा आर्चरने गेल्या मोसमात मुंबईकडून ५ सामने खेळले होते आणि फक्त 2 विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर दुखापतीमुळे तो आयपीएलमधून बाहेर पडला होता. जोफ्रा आर्चरव्यतिरिक्त मुंबईने ट्रिस्टन स्टब्स, मार्को यानसेन, झाय रिचर्डसन, रिले मेरेडिथ आणि ख्रिस जॉर्डन सह ११ खेळाडूंना रिलीज केले आहे. रिलीज केलेल्या खेळाडूंमध्ये ६ परदेशी आणि ५ भारतीय खेळाडूंचा समावेश आहे.

रिलीज केलेले खेळाडू

मुंबई इंडियन्सने ११ खेळाडूंना रिलीज केले आहे. यामध्ये मोहम्मद अर्शद खान, रमणदीप सिंग, हृतिक शौकीन, राघव गोयल, जोफ्रा आर्चर, ट्रिस्टन स्टब्स, डुआन यानसेन, जे रिचर्डसन, रिले मेरेडिथ, ख्रिस जॉर्डन आणि संदीप वॉरियर यांच्या नावांचा समावेश आहे.

मुंबई इंडियन्सचा सध्याचा संघ : रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, सूर्यकुमार यादव, देवाल्ड ब्रेविस, विष्णू विनोद, नेहल वढेरा, शम्स मुलानी, अर्जुन तेंडुलकर, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, शम्स मुलानी, कॅमेरॉन ग्रीन, जसप्रीत बुमराह, बेसनडॉर्फ, जेसन. , पियुष चावला, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

Igatpuri Tunnel Latest Update : समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! इगतपुरी बोगदा 'या' वेळेत बंद राहणार, काय आहे कारण?

Marathi News Live Updates : सुशिक्षित पूर्वज असल्याने आदिवासी दावा नाकारता येणार नाही, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

September 1 Rule Changes 2026 : सप्टेंबर १ तारखेपासून बदलणार ५ महत्त्वाचे नियम; सामान्यांच्या खिशावर परिणाम, LPG सिलिंडरपासून कारच्या किमतीपर्यंत मोठे बदल

SCROLL FOR NEXT