IPL 2024 Playoff Scenario after CSK vs SRH match sakal
IPL

प्लेऑफची शर्यत झाली रोमांचक! CSK च्या विजयाने Points Tableचे बदलले गणित; मुंबईवर टांगती तलवार

IPL 2024 Playoff Scenario : आयपीएल 2024 मध्ये प्लेऑफची शर्यत आता रोमांचक झाली आहे. सर्व संघ आपापले सामने जिंकून प्लेऑफच्या दिशेने पाऊल टाकत आहे. परंतु केवळ चारच संघ प्लेऑफमध्ये जाऊ शकतात.

Kiran Mahanavar

IPL 2024 Playoff Scenario : आयपीएल 2024 मध्ये प्लेऑफची शर्यत आता रोमांचक झाली आहे. सर्व संघ आपापले सामने जिंकून प्लेऑफच्या दिशेने पाऊल टाकत आहे. परंतु केवळ चारच संघ प्लेऑफमध्ये जाऊ शकतात.

विशेष म्हणजे आजपर्यंत एकही संघ प्लेऑफसाठी पात्र ठरला नाही किंवा कोणताही संघ या शर्यतीतून बाहेर पडलेला नाही. अशा स्थितीत आगामी सामने आणखीनच रंजक होण्याची अपेक्षा आहे.

दरम्यान, चेन्नईने हैदराबादवर विजय मिळवल्यानंतर पॉइंट टेबलची समीकरणे पुन्हा एकदा बदलली आहेत. सीएसकेच्या विजयामुळे एकाच वेळी तीन संघांचे नुकसान झाले आहे.

ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली चेन्नई संघाने मागील दोन सामने गमावले होते, ज्यामुळे संघ गुणतालिकेत टॉप चार मधून बाहेर पडला होता. मात्र सनरायझर्स हैदराबादवर मोठ्या विजयानंतर त्याने पुन्हा एकदा टॉप 4 मध्ये एन्ट्री मारली आहे. तर उर्वरित तीन संघांना त्यांच्या स्थानावरून खाली जावे लागले आहे. मोठी गोष्ट म्हणजे सध्या एकूण 5 संघांचे समान 10 गुण आहेत. अशा स्थितीत पुढची लढाई आणखी रंजक होईल, अशी आशा आहे.

आयपीएलच्या ताज्या पॉइंट्स टेबलबद्दल बोलायचे तर राजस्थान रॉयल्सचा संघ 9 पैकी 8 सामने जिंकून 16 गुण घेत प्लेऑफच्या अगदी जवळ उभा आहे. तर केकेआर, चेन्नई आणि सनरायझर्स हैदराबाद प्रत्येकी 10 गुणांसह दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत. या तिघांव्यतिरिक्त, एलएसजी आणि दिल्ली कॅपिटल्सने देखील 10 गुण मिळवले आहेत, परंतु ते शीर्ष 4 मधून बाहेर आहेत. हे संघ पाचव्या आणि सहाव्या स्थानावर आहेत.

समान 10 गुण असलेल्या संघांमध्ये केकेआर अधिक फायद्यात आहे, तर दिल्ली कॅपिटल्स तोट्यात आहे. केकेआरने केवळ 8 सामने खेळून 10 गुण मिळवले आहेत, तर दिल्ली संघाने 10 सामने खेळून इतके गुण मिळवले आहेत. गुजरात टायटन्सचे 8 गुण आहेत.

त्याच वेळी, मुंबईवर टांगती तलवार आहे. मुंबई इंडियन्सने फक्त 3 सामने जिंकले आहेत. यासोबत दोन संघांचे समान 6 गुण आहेत. ज्यामध्ये पंजाब किंग्ज आणि आरसीबी. त्यांचे 3 सामने जिंकून 6 गुण आहेत आणि सध्या ते आठव्या आणि दहाव्या स्थानावर आहेत. तर मुंबई नवव्या क्रमांकावर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT