IPL 2024 Playoffs Scenario all 10 Teams sakal
IPL

IPL 2024 Playoffs Scenario : अर्धी आयपीएल संपली! तळातल्या संघांना प्लेऑफसाठी करावे लागणार करेक्ट नियोजन, जाणून घ्या 10 संघांचे समीकरण

IPL 2024 Playoffs Scenario all 10 Teams : आयपीएल 2024 मध्ये जवळपास अर्धा टप्पा संपला आहे. जसजसे सामने होत आहेत, तसतसे प्लेऑफची शर्यत रोमांचक बनत आहे.

Kiran Mahanavar

IPL 2024 Playoffs Scenario : आयपीएल 2024 मध्ये जवळपास अर्धा टप्पा संपला आहे. जसजसे सामने होत आहेत, तसतसे प्लेऑफची शर्यत रोमांचक बनत आहे. आतापर्यंत राजस्थान रॉयल्स, कोलकाता नाइट रायडर्स, सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्ज या संघांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

असे अनेक संघ आहेत ज्यांचा खेळ पाहता त्यांना प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यात कोणतीही अडचण येणार नाही. त्याचबरोबर काही संघांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. प्लेऑफमध्ये जाण्यासाठी प्रत्येक संघाला काय करावे लागेल याचे समीकरण जाणून घेऊया.

1. राजस्थान रॉयल्स - राजस्थान रॉयल्स संघाने जवळपास प्लेऑफमध्ये एक पाऊल पुढे टाकले आहे. त्यांच्याकडे 7 सामन्यांतून 12 गुण आहेत आणि त्यांना उर्वरित 7 पैकी फक्त 3 सामने जिंकायचे आहेत.

2. कोलकाता नाइट रायडर्स - केकेआर संघही प्लेऑफमध्ये जाण्याचा प्रबळ दावेदार आहे. संघाचे सध्या 6 सामन्यांतून 8 गुण आहेत. त्यांना आणखी किमान चार सामने जिंकावे लागतील किंवा उर्वरित आठ सामन्यांपैकी पाच सामने जिंकावे लागतील.

3. चेन्नई सुपर किंग्ज - पॉइंट टेबलमध्ये सीएसके तिसऱ्या स्थानावर आहे. प्लेऑफमध्ये जाण्यासाठी त्यांना पण त्यांच्या उर्वरित 7 पैकी किमान 4 किंवा 5 सामने जिंकावे लागतील. आता त्याचे सात सामन्यात 8 गुण आहेत.

4. सनराईजर्स हैदराबाद - पॉइंट टेबलमध्ये सनरायझर्स हैदराबाद 8 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. 4 मध्ये जाण्यासाठी त्यांना पण त्यांच्या उर्वरित 8 पैकी किमान 4 किंवा 5 सामने जिंकावे लागतील.

5. लखनौ सुपर जायंट्स - केएल राहुलच्या लखनौचे सध्या आठ गुण आहे, पण त्यांंचा संघ पाचव्या स्थानावर आहे. त्यांना पण टॉप 4 मध्ये पोहोचण्यासाठी उर्वरित 7 पैकी किमान 5 सामने जिंकावे लागतील. 4 सामने जिंकले तर त्यानंतर चर्चा नेट रनरेटची होईल.

6. दिल्ली कॅपिटल्स - पहिल्या सलग दोन पराभवानंतर दिल्ली कॅपिटल्सने चांगले पुनरागमन केले. आता संघ 7 सामन्यांत 6 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. जर त्यांना प्लेऑफमध्ये जायचे असेल तर त्यांना आणखी 5 सामने जिंकावे लागतील आणि नेट रनरेटही चांगला राखावा लागेल.

7. मुंबई इंडियन्स - सात सामन्यांत 6 गुणांसह मुंबई इंडियन्सचा संघ सातव्या स्थानावर आहे. जर त्यांना प्लेऑफमध्ये जायचे असेल तर त्यांना आणखी किमान 6 सामने जिंकावे लागतील. जर त्यांनी 5 सामने जिंकल्यास तर नेट रन रेट चांगला ठेवावा लागेल.

8. गुजरात टायटन्स - आठव्या स्थानावर 6 गुणांसह गुजरात टायटन्सचा संघ आहे. जर त्यांना प्लेऑफमध्ये जायचे असेल तर त्यांना उर्वरित 7 पैकी किमान 6 सामने जिंकावे लागतील. यासोबत नेट रनरेटही चांगला राखावा लागेल.

9. पंजाब किंग्ज - पंजाब किंग्जने आतापर्यंत 7 पैकी फक्त 2 सामने जिंकले आहेत. त्यामुळे प्लेऑफमध्ये जाण्यासाठी त्यांना आता उर्वरित सर्व सामने जिंकावे लागणार आहेत. एकही सामना हरला तरी नेट रनरेट इतर संघांपेक्षा चांगली असावी लागेल.

10. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू - आरसीबीचा संघ आता सध्या तळाशी आहे. त्याने आतापर्यंत फक्त 1 सामना जिंकला आहे. जर त्यांना प्लेऑफमध्ये जायचे असेल तर त्यांना उर्वरित सात सामने जिंकावे लागतील आणि नेट रनरेट चांगला ठेवावा लागेल. एकही सामना गमावल्यास ते बाहेर जातील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Best Election Results: ठाकरे ब्रँडला एकटे प्रसाद लाड कसे ठरले वरचढ? मुंबईतल्या 'बेस्ट'च्या निवडणुकीचा निकाल

Stock Market Closing: शेअर बाजार 3 आठवड्यांच्या उच्चांकावर बंद; आयटी आणि एफएमसीजीमध्ये मोठी वाढ

बॉलिवूडचा एक असा खलनायक ज्याच्यामुळे अमिताभ बच्चन झाले सुपरस्टार ! त्याचा मृत्यू अखेरपर्यंत रहस्यच राहिला

Who Is Shashank Rao : बेस्ट निवडणुकीत ठाकरे बंधुंना शह देणारे शशांक राव कोण? कशी केली कमाल?

Rain-Maharashtra Latest Live News Update: नांदेडमध्ये पुरामुळे लाखो हेक्टर वरील शेती पिकांचे नुकसान

SCROLL FOR NEXT