IPL 2024 Points Table after CSK vs SRH Match sakal
IPL

IPL 2024 Points Table : चेन्नईच्या पराभवाचा दोन संघाना बसला मोठा धक्का! पॉइंट टेबलमध्ये मोठी उलथापालथ

IPL 2024 Points Table after CSK vs SRH Match : आयपीएल 2024 मध्ये चेन्नई सुपर किंग्ज या संघाने हंगामात चांगली सुरुवात केली होती, मात्र आता त्यांना सलग 2 सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे.

Kiran Mahanavar

IPL 2024 Points Table after CSK vs SRH Match : आयपीएल 2024 मध्ये चेन्नई सुपर किंग्ज या संघाने हंगामात चांगली सुरुवात केली होती, मात्र आता त्यांना सलग 2 सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे.

प्रथम, दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपर किंग्जचा पराभव केला होता. आता हैदराबादविरुद्ध पराभव झाला आहे. सीएसकेच्या हैदराबादविरुद्धच्या पराभवामुळे चेन्नईने केवळ स्वतःचेच नुकसान केले नाही तर इतर दोन संघांना धक्का बसला आहे. सीएसकेचा पराभव आणि हैदराबादच्या विजयामुळे पॉइंट टेबलमध्ये मोठी उलथापालथ झाली आहेत.

या सामन्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्ज गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर होता. आणि चेन्नईने 3 पैकी 2 सामने जिंकले होते, मात्र या पराभवामुळे सीएसकेचे गुणतालिकेत कोणतेही नुकसान झाले नसले तरी गुण निश्चितच कमी झाले आहेत. सीएसके अजूनही पॉइंट टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे.

दुसरीकडे, हैदराबादचा संघ या सामन्यापूर्वी गुणतालिकेत सातव्या स्थानावर होता, 3 सामन्यांपैकी दोन विजय मिळवून आता तो पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील संघ हैदराबादने गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्जला मागे टाकले आहे.

अशा स्थितीत चेन्नईच्या पराभवाने या दोन्ही संघांना धक्का बसला आहे. जर सीएसकेने हा सामना जिंकला असता, तर गुजरात पाचव्या स्थानावर आणि पंजाब सहाव्या स्थानावर राहिला असता, परंतु सीएसकेने दोघांचेही नुकसान केले आहे.

सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात चेन्नईने 5 गडी गमावून 165 धावा केल्या आणि हैदराबादला विजयासाठी 166 धावांचे लक्ष्य दिले. शिवम दुबेने सीएसकेकडून तुफानी खेळी खेळली. त्याने 24 चेंडूत 45 धावांची खेळी केली. याशिवाय अजिंक्य रहाणे आणि रवींद्र जडेजानेही 30 प्लस स्कोअर केले.

गोलंदाजी खेळपट्टीमुळे हे लक्ष्य हैदराबादसाठी सोपे जाणार नव्हते. पण एडन मार्करामचे अर्धशतक आणि अभिषेक शर्माच्या झंझावाती खेळीमुळे हैदराबादने हा सामना सहज जिंकला. या सामन्यात अभिषेक शर्माने अवघ्या 12 चेंडूत 37 धावांची खेळी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : विजय मेळाव्यासाठी जोशात निघाले शिवसैनिक आणि मनसैनिक, कोळी बँडच्या तालावर मुंबई थरारली!

मुंबईत हिंदीत बोलणार, औकात असेल तर हात लावून दाखवा; स्वामी आनंद स्वरुप यांचं ठाकरे बंधूंना आव्हान

ENG vs IND: १ बॉल ६ धावा अन् भारताची कर्णधार आऊट; इंग्लंडचा भारतावर शेवटच्या चेंडूवर विजय

Kondhwa Case कुरिअर बॉय बनून नेहमी फ्लॅटवर यायचा, शरीरसंबंधावरून बिनसलं अन् तरुणीने पोलीस ठाणं गाठलं; तरुणाला माहितीच नाही आपण....

'या' चित्रपटाआधी भारतात नव्हतं संतोषी माताचं मंदिर, सिनेमा आला अन् सुरु झाले व्रत-उपास! चित्रपट पाहण्यासाठी चप्पल काढून जायचे प्रेक्षक

SCROLL FOR NEXT