RCB Bengaluru Water Crisis IPL 2024  esakal
IPL

RCB Bengaluru Water Crisis IPL 2024 : आरसीबीच्या होम टाऊनमध्ये पाणी संकट, KSCA ने बोलावली तातडीची बैठक

IPL 2024 Bengaluru Water Crisis : बंगळुरूत सध्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. आरसीबीचे होम ग्राऊंड चिन्नास्वामी स्टेडियम हिरवे गार ठेवणे आणि खेळपट्टी खेळण्यायोग्य ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पाणी लागणार आहे.

अनिरुद्ध संकपाळ

RCB Bengaluru Water Crisis IPL 2024 : रॉयल चॅलेंजर बेंगलोरचे होम टाऊन बंगळुरू सध्या पाणी संकटातून जात आहे. याचा परिणाम हा आगामी आयपीएलच्या सामन्यांवर होण्याची दाट शक्यता आहे. आरसीबी त्याचे सामने होम ग्राऊंड बंगळुरूमधील चिन्नास्वामी स्टेडियमवर केळणार आहे. 25 मार्चला आरसीबी पंजाब किंग्जसोबत खेळणार आहे.

दरम्यान, कर्नाटक स्टेट क्रिकेट असोसिएशनने (KSCA) पाणी संकटावर चर्चा करून उपाय शोधण्यासाठी बैठक बोलावली आहे. त्यामुळे KSCA आयपीएल सामन्यांसाठीच्या खेळपट्ट्यांना कसं पाणी पुरवणार हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.

कर्नाटकची राजधानी बंगळुरूवरील पाणी संकट दिवसेंदिवस गडद होत चाललं आहे. त्यातच चिन्नास्वामी स्टेडियमवर आयपीएलचे सामने आयोजित करायचे आहेत. इतके दिवस खेळपट्टी खेळण्यायोग्य ठेवण्यासाठी तिला मोठ्या प्रमाणावर पाणी देण्याची गरज आहे. तसेच आऊट फिल्ड देखील हिरवी गार ठेण्यासाठी मुबलक पाणी लागणार आहे.

शहरावर गडद होत असलेल्या पाणी संकटामुळे कर्नाटक क्रिकेट असोसिएशनला आयपीएलसाठी स्टेडियम तयार ठेवणं खूप अडचणीचं जाणार आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी कर्नाटक क्रिकेट असोसिएशनने बैठक बोलावली आहे. KSCA च्या एका सदस्याने इनसाईड स्पोर्ट्सला दिलेल्या माहितीनुसार या बैठकीनंतर असोसिएशन एक वक्तव्य प्रसिद्ध करणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाणी संकटावर असोसिएशनने बैठक बोलावली आहे. पाणी प्रश्न आणि आयपीएलची तयारी याबाबत या बैठकीनंतरच कोणतेही वक्तव्य प्रसिद्ध करण्यात येईल.

Bengaluru water crisis explained

यंदा पावसाने ओढ दिल्याने कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये मार्चमध्येच पाण्याचा तुटवडा जाणवू लागला आहे. शहरातील टँकरची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. गेल्या आठवड्यात यात जास्तच वाढ झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार जो पाण्याचा टँकर 700 ते 800 रूपयाला मिळत होता तो आता 1500 ते 1800 रूपयापर्यंत पोहचला आहे. ही परिस्थिती बंगळुरू पाणी पुरवठा विभागाने पुढच्या पाच महिने पुरेल इतका पाणी साठा उपलब्ध असल्याचे सांगुनही उद्भवली आहे.

सध्या आयपीएल 2024 च्या सुरूवातीचेच शेड्युल जाहीर झाले आहे अजून दुसऱ्या हाफचे शेड्युल जाहीर झालेले नाही. निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर बीसीसीआय आयपीएलचे उर्वरित शेड्युल जाहीर करणार आहे.

(IPL Cricket News In Marathi)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Chairman : माळेगाव कारखाना चेअरमनपदी अखेर अजितदादाचं! , विरोधकांच्या आक्षेपावर निवडणूक अधिकारी म्हणाले, आता...

ENGU19 vs INDU19 : १३ चौकार, १० षटकार! वैभव सूर्यवंशीचे विक्रमी शतक; फक्त २३ चेंडूंत चोपल्या ११२ धावा, निघाली इंग्लंडची हवा

Mumbai News: मुंबईत पावसामुळे रस्त्यांची दैना, खड्ड्यांची आकडेवारी समोर, पण पालिकेचा वेगळाच दावा

Cyber Fraud : जळगावात सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार: 'सीबीआय'च्या नावाने निवृत्त डॉक्टरला ३१ लाखांना गंडवले

Top 5 Government Schemes: सरकारच्या तिजोरीतून तुमच्यासाठी खास! ‘पीएम किसान’सारख्या 'या' 5 योजना ठरतील तुमचं आर्थिक कवच

SCROLL FOR NEXT