IPL

IPL 2024 : मुंबई-चेन्नई नाही तर 'या' टीमची पर्स सर्वात तगडी! लिलावात करणार सर्वाधिक खर्च... कोणाकडे किती पैसे जाणून घ्या

Kiran Mahanavar

IPL 2024 : इंडियन प्रीमियर लीगच्या 2024 च्या मोसमाची तयारी जोरात सुरू आहे. आयपीएल 2024 साठी खेळाडूंचा लिलाव 19 डिसेंबर रोजी दुबई येथे होणार आहे. या दिवशी, आयपीएलचे सर्व 10 संघ आपापल्या संघात सर्वोत्तम खेळाडूंचा समावेश करण्याचा प्रयत्न करताना दिसतील. प्रत्येक संघाची एक निश्चित रक्कम असते ज्यामध्ये ते संघात नवीन खेळाडूंचा समावेश करू शकतात. या बाबतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आघाडीवर आहे.

आयपीएल 2023 पर्यंत सर्व फ्रँचायझींकडे पर्समध्ये जास्तीत जास्त 95 कोटी रुपये होते, परंतु बीसीसीआयने त्यात 5 कोटी रुपयांची वाढ केली. आणि आता सर्व संघांकडे आयपीएल 2024 मध्ये खर्च करण्यासाठी त्यांच्या पर्समध्ये 100 कोटी रुपये असतील.

मात्र, यावेळी खेळाडूंना सोडल्यानंतर संघांकडे शिल्लक असलेल्या पैशात आणखी 5 कोटींची भर पडणार आहे. आयपीएल 2024 लिलावापूर्वी खेळाडूंना सोडल्यानंतर, ज्या संघाकडे सर्वात जास्त पैसे शिल्लक आहेत तो RCB आहे. फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखालील आरसीबीकडे सध्या लिलावात खर्च करण्यासाठी 40.75 कोटी रुपये शिल्लक आहेत.

कोणत्या संघाच्या पर्समध्ये किती पैसे आहेत शिल्लक ?

  • रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - 40.75 कोटी

  • सनरायझर्स हैदराबाद - 34 कोटी

  • कोलकाता नाइट रायडर्स - रु. 32.7 कोटी

  • चेन्नई सुपर किंग्ज- 31.4 कोटी

  • पंजाब किंग्स- 29.1 कोटी

  • दिल्ली कॅपिटल्स- 28.95 कोटी

  • मुंबई इंडियन्स- रु. 15.25 कोटी

  • राजस्थान रॉयल्स- 14.5 कोटी

  • लखनऊ सुपर जायंट्स – 13.90 कोटी

  • गुजरात टायटन्स - 13.85 कोटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Gokul Election 2026 : 'गोकुळ'च्या सत्ताकारणाचा काउंटडाऊन सुरू! अंतिम मतदार यादीची तारीख ठरली; उमेदवारी अर्जाचा मुहूर्तही निश्चित, 410 संस्थांच्या हरकतीवर सुनावणी

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : कात्रज घाटात भाजपशी संबंधित निवडणूक साहित्याचा खच; स्वच्छता ग्रुपकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT