RR vs DC IPL 2024 Live Streaming Details News Marathi sakal
IPL

RR vs DC IPL 2024 : दिल्ली राजस्थानला रोखणार? पंतची सेना पहिल्या विजयासाठी सज्ज; किती वाजता रंगणार थरार?

Rajasthan Royals vs Delhi Capitals IPL 2024 : भीषण अपघातातून सावरत ४५३ दिवसांनंतर क्रिकेटच्या मैदानात उतरणाऱ्या रिषभ पंतला आयपीएलच्या सलामीच्या लढतीत मोठा प्रभाव टाकता आला नाही.

Kiran Mahanavar

Rajasthan Royals vs Delhi Capitals : भीषण अपघातातून सावरत ४५३ दिवसांनंतर क्रिकेटच्या मैदानात उतरणाऱ्या रिषभ पंतला आयपीएलच्या सलामीच्या लढतीत मोठा प्रभाव टाकता आला नाही. दिल्ली कॅपिटल्सला पंजाब किंग्सकडून हार पत्करावी लागली. या पराभवाला मागे टाकत आता दिल्लीचा संघ आज (ता. २८) राजस्थान रॉयल्सशी दोन हात करणार आहे.

संजू सॅमसनच्या नेतृत्वात राजस्थानच्या संघाने सलामीच्या लढतीत लखनौ सुपर जायंटस् संघावर २० धावांनी विजय मिळवत दमदार सुरुवात केली. आता शानदार फॉर्ममध्ये असलेल्या यजमान राजस्थानला रोखण्याचे काम दिल्लीला करावे लागणार आहे.

‌दिल्ली संघाचे मुख्य प्रशिक्षक रिकी पॉंटिंग यांनी रिषभ पंतच्या पुनरागमनाबाबत आनंद व्यक्त करीत संघ आणखी भक्कम झाल्याची भावना व्यक्त केली. पाँटिंग यांनी डेव्हिड वॉर्नर व मिचेल मार्श या ऑस्ट्रेलियन खेळाडूंकडे सलामी फलंदाजांची जबाबदारी सोपवली. दोघांनी सलामीच्या लढतीत आश्‍वासक सुरुवात केली, पण मोठी खेळी करता आली नाही.

याच कारणामुळे मधल्या फळीत रिषभ पंत व शेई होप या दोन फलंदाजांना दिल्लीसाठी मोलाची कामगिरी बजावावी लागणार आहे. अभिषेक पोरेल याने इम्पॅक्ट खेळाडू म्हणून पंजाबविरुद्धच्या लढतीत चमक दाखवली. त्याला वरच्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवण्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अक्षर, कुलदीपकडून अपेक्षा

दिल्लीचा गोलंदाजी विभाग कमकुवत आहे. इशांत शर्माला दुखापत झाली असून खलील अहमद याच्या गोलंदाजीवर पहिल्या लढतीत आक्रमण करण्यात आले. मिचेल मार्श हा अष्टपैलू खेळाडू आहे. त्यामुळे प्रत्येक सामन्यात गोलंदाजीत तो धमक दाखवेलच असे नाही. त्यामुळे अक्षर पटेल व कुलदीप यादव या दोन फिरकीपटूंकडून दिल्लीला मोठ्या अपेक्षा आहेत.

संजूकडून सातत्यपूर्ण कामगिरीची आशा

राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन याने लखनौविरुद्धच्या सलामीच्या लढतीत नाबाद ८२ धावांची खेळी साकारत विजयात मोलाचा वाटा उचलला. आयपीएलच्या सुरुवातीच्या लढतींमध्ये संजूकडून नेहमीच चांगले प्रदर्शन करण्यात येते. आयपीएलचा टप्पा पुढे सरकतो तेव्हा त्याला प्रतिमेला साजेशी कामगिरी करता येत नाही. यंदाच्या मोसमात त्याला या कमकुवत बाबींवर लक्ष द्यावे लागणार आहे. यशस्वी जयस्वाल, जॉस बटलर, रियान पराग, शिमरोन हेटमायर, ध्रुव जुरेल यांच्या समावेशामुळे राजस्थानची फलंदाजी भक्कम होते. दिल्लीच्या गोलंदाजांसमोर कडवे आव्हान असणार आहे.

गोलंदाजी विभाग अव्वल

राजस्थानचा गोलंदाजी विभागही अव्वल दर्जाचा आहे. ट्रेंट बोल्ट, आवेश खान व संदीप शर्मा या वेगवान गोलंदाजांसोबत रवीचंद्रन अश्‍विन व युझवेंद्र चहल या अनुभवी फिरकी गोलंदाजांमुळे राजस्थानच्या संघाला बळकटी येते. राजस्थानच्या पहिल्या विजयात गोलंदाजांचे योगदानही महत्त्वाचे होते. त्यामुळे राजस्थानला कमी लेखून चालणार नाही.

आजची लढत

राजस्थान रॉयल्स - दिल्ली कॅपिटल्स

स्थळ - जयपूर, वेळ - रात्री ७.३० वाजता

प्रक्षेपण - स्टार, जिओ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

BJP President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी महिलेला संधी? निर्मला सीतारामन यांच्यासह 'या' नावांची होतेय चर्चा

SCROLL FOR NEXT