IPL 2024 Schedule esakal
IPL

IPL 2024 Schedule Live Streaming : विराट Vs धोनी! तत्पूर्वी होणार दमदार उद्घाटन सोहळा, जाणून घ्या कधी अन् कुठं पाहायचा सामना

अनिरुद्ध संकपाळ

IPL 2024 Schedule Live Streaming : आयपीएलचा 17 वा हंगाम हा 22 मार्चपासून सुरू होत आहे. यंदाच्या हंगामात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक बदल करण्यात आले आहे. यामुळेच गतविजेत्या आणि उपविजेत्या संघातील सलामीचा सामना यावेळी होणार नाही. 22 मार्चला पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर बंगळुरू यांच्यात होणार आहे.

आयपीएलच्या 17 व्या हंगामात अनेक गोष्टी वेगळ्या होणार आहेत. अनेक खेळाडू हे पुनरागमन करणार आहेत. तर टी 20 वर्ल्डकपच्या तोंडावर भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी अनेक खेळाडू प्रयत्नशील असणार आहेत. यात विराट कोहलीपासून इशान किशन पर्यंत अनेकांचा समावेश आहे. तसेच ऋषभ पंत कितपत फिट झाला आहे याची चाचणी देखील आयपीएलमध्येच होईल.

विराट कोहली अकायच्या जन्मानंतर पहिल्यांदाच मैदानावर उतरणार आहे. त्यामुळे डॅडी विराट कशी कामगिरी करतो हा उत्सुकतेचा विषय असेल. त्याचबरोबर वर्ल्डकपच्या टी 20 संघात विराट कोहलीला खेळवायचं की नाही याबाबत देखील चर्चा सुरू आहे. धोनी देखील वर्षानंतर आणि गुडघ्यावरील शस्त्रक्रियेनंतर मैदानावर उतरणार आहे. या सर्व गोष्टी यंदाची आयपीएल पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता वाढवतील.

आयपीएलचे 7 एप्रिलपर्यंतचे वेळापत्रक

  • 22 मार्च, रात्री 8:00 IST: CSK विरुद्ध RCB, चेन्नई.

  • 23 मार्च, दुपारी 3:30 pm IST: PBKS vs DC, मोहाली.

  • 23 मार्च, 7:30 pm IST: KKR vs SRH, कोलकाता.

  • 24 मार्च, दुपारी 3:30 IST: RR विरुद्ध LSG, जयपूर.

  • 24 मार्च, 7:30 pm IST: GT vs MI, अहमदाबाद.

  • 25 मार्च, संध्याकाळी 7:30 IST: RCB विरुद्ध PBKS, बेंगळुरू.

  • 26 मार्च, 7:30 pm IST: CSK vs GT, चेन्नई.

  • 27 मार्च, 7:30 pm IST: SRH vs MI, हैदराबाद.

  • 28 मार्च, 7:30 pm IST: RR vs DC, जयपूर.

  • 29 मार्च, संध्याकाळी 7:30 IST: RCB विरुद्ध KKR, बेंगळुरू.

  • 30 मार्च, संध्याकाळी 7:30 IST: LSG vs PBKS, लखनौ.

  • ३१ मार्च, दुपारी ३:३० IST: GT vs SRH, अहमदाबाद.

  • 31 मार्च, 7:30 pm IST: DC विरुद्ध CSK, विझॅक.

  • 1 एप्रिल, संध्याकाळी 7:30 IST: MI vs RR, मुंबई.

  • 2 एप्रिल, संध्याकाळी 7:30 IST: RCB विरुद्ध LSG, बेंगळुरू.

  • 3 एप्रिल, संध्याकाळी 7:30 IST: DC विरुद्ध KKR, Vizag.

  • 4 एप्रिल, 7:30 pm IST: GT vs PBKS, अहमदाबाद.

  • 5 एप्रिल, संध्याकाळी 7:30 IST: SRH vs CSK, हैदराबाद.

  • 6 एप्रिल, 7:30 pm IST: RR vs RCB, जयपूर

  • 7 एप्रिल, दुपारी 3:30 IST: MI vs DC, मुंबई.

  • 7 एप्रिल, 7:30 pm IST: LSG vs GT, लखनौ.

आयपीएलचे पूर्ण शेड्युल अजून जाहीर झालेले नाही ते येत्या काही दिवसात जाहीर होण्याची शक्यता आहे.

इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 कर्णधार

चेन्नई सुपर किंग्स: एमएस धोनी

दिल्ली कॅपिटल्स: ऋषभ पंत

गुजरात टायटन्स: शुभमन गिल

कोलकाता नाइट रायडर्स: श्रेयस अय्यर

लखनऊ सुपर जायंट्स: केएल राहुल

मुंबई इंडियन्स: हार्दिक पांड्या

पंजाब किंग्स: शिखर धवन

राजस्थान रॉयल्स: संजू सॅमसन

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर: फाफ डु प्लेसिस

सनरायझर्स हैदराबाद: पॅट कमिन्स

यंदाच्या आयपीएलमध्ये बक्षीस रक्कम किती असेल?

आयपीएलच्या 17 व्या हंगामासाठी बीसीसीआयने बक्षीस रक्कम किती असेल याची घोषणा केलेली नाही. गेल्या हंगामात विजेत्या संघाला 20 कोटी रूपये मिळाले होते. तर उपविजेत्या संघाला 13 कोटी रूपये मिळाले होते.

आयपीएलच 2024 चे टेलिकास्ट आणि लाईव्ह स्ट्रीमिंग कोठून होणार?

आयपीएलचा 17 वा हंगाम टीव्हीवर स्टार स्पोर्ट्सवरून टेलिकास्ट होणार आहे. तर आयपीएलचे लाईव्ह स्ट्रीमिंग हे जिओ सिनेमावरून करण्यात येणार आहे.

(IPL Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडविरुद्ध विश्वविक्रमी शतक केल्यानंतर शुभमन गिलचं नाव घेत म्हणतोय, आता लक्ष्य २०० धावा; VIDEO

Crime News: "ऐका! आता मी शारीरिक संबंध ठेवणार नाही, माझ्या नवऱ्याला...", प्रियकर मानलाच नाही शेवटी असा धडा शिकवला की...

Thane Politics: पुलाचे घाईत उद्घाटन, चालकांचा जीव धोक्यात, गुन्हा दाखल करा; ठाकरे गट आक्रमक

संतापजनक घटना! 'फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून महिलेवर अत्याचार'; उरुळी कांचन पोलिसांकडून दोघांना अटक

Pune Accident: 'आषाढी एकादशी दिवशीच पती-पत्नीचा अपघाती मृत्यू'; वारीवरून परतत असताना काळाचा घाला, परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT