SRH vs RR | IPL 2024  Sakal
IPL

IPL 2024, Qualifier 2: फायनलच्या तिकीटासाठी हैदराबाद-राजस्थान भिडणार, पण पाऊस करणार खोळंबा? वाचा काय आहेत हवामान अंदाज

SRH vs RR, Qualifier 2: हैदराबाद-राजस्थान सामन्यात पावसाचा अडथळा? सामना रद्द झाल्यास कोणाला मिळणार फायनलचं तिकीट

Pranali Kodre

SRH vs RR, Qualifier 2: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत दुसरा क्वालिफायर सामना शुक्रवारी (२४ मे) खेळवला जाणार आहे. हा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात होणार आहे. चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियम (चेपॉक) स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल.

अंतिम सामन्याचे तिकीट मिळवण्यासाठी हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. या सामन्यात विजय मिळवणारा संघ अंतिम सामन्यात प्रवेश करणार आहे.

अशात भारतातील अनेक ठिकाणी सध्या मान्सूनपूर्व पाऊस कोसळताना दिसत आहे. यापूर्वीही आयपीएलचे काही सामनेही पावसामुळे रद्द झाले आहेत. त्यामुळे चेन्नईत शुक्रवारी कसे वातावरण असेल, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

हवामान अंदाज

दरम्यान, हवामान अंदाजानुसार चेन्नईमध्ये पावसाच्या हलक्या सरी बरसण्याची शक्यता आहे. परंतु, पावसाचा मोठा अडथळा सामन्यात येण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. पण चेन्नईत शुक्रवारी बऱ्यापैकी ढगाळ वातावरण राहण्याती शक्यता आहे.

तरी शुक्रवारी सामना पावसाचा अडथळा आला, तरी दोन तास पंच सामना सुरू होण्याची प्रतिक्षा करू शकतात. तसेच कमीत कमी 5-5 षटकांचा सामना होणे गरजेचे आहे.

जर सामना शुक्रवारी होऊ शकला नाही, तर शनिवार हा राखीव दिवस देखील असणार आहे. तसेच अखेरीस 5-5 षटकांचाही सामना न झाल्यास सुपर ओव्हरने सामन्याचा निकाल काढण्याचा प्रयत्न होईल.

मात्र काही शक्य झाले नाही आणि सामना रद्दच करावा लागला, तर पाँइंट्स टेबसमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या सनरायझर्स हैदराबादला अंतिम सामन्यात प्रवेश मिळेल.

आमने-सामने आकडेवारी

सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स संघात आत्तापर्यंत 19 सामने खेळवण्यात आले असून हैदराबादने 10 सामने जिंकलेत, तर राजस्थानने 9 सामने जिंकले आहेत.

गेल्या 6 सामन्यातील इतिहास पाहता ३ सामने राजस्थानने आणि 3 सामने हैदराबादने जिंकले आहेत. आयपीएल 2024 मध्ये या दोन संघात एकच सामना झाला होता, ज्यात हैदराबादने अवघ्या 1 धावेने रोमांचक विजय मिळवलेला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM, T20 WC: अभिषेक शर्माला सूर गवसला, भारताने उभारली वर्ल्ड कपमधील सर्वोच्च धावसंख्या; २००७ चा विक्रम मोडला

Khamgaon Crime : सख्ख्या भावाचा खून करून मृतदेह जाळला व राख फेकली नदीत; राहुड येथील घटना, दोन्ही आरोपीस अटक

IND vs ZIM, T20 WC: ८ चेंडूंत ४० धावा! अभिषेक शर्माची फिफ्टी, सूर्याला 'स्वच्छ भारत'चा सदिच्छादूत बनवण्याची गावस्करांची मागणी

Latest Marathi News Live Update : ‘शाळा दत्तक धोरणा’वरून पालिका सभेत जोरदार खडाजंगी

Murud News : विद्युत पोलवर काम करताना तरुणाचा मृत्यू; आर्थिक मदतीसाठी नातेवाईकांचा रास्ता रोको

SCROLL FOR NEXT